परभणी : सत्तांतराची मुहूर्तमेढ रोवणारी ही निवडणुक ठरणार- पंकजा मुंढे यांचा परभणीत दावा

गणेश पांडे
Thursday, 26 November 2020

औद्योगिक परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालायात पदविधरांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी (ता.26) घेण्यात आला. व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, किशोर कोंडगे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, रामप्रभू मुंडे, विठ्ठलराव रबदडे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, रामकिशन रौंदळे, अजय गव्हाणे, बाळासाहेब भालेराव, संजय रिझवाणी, मधुकर गव्हाणे, राजेश देशपांडे, एन.डी. देशमुख, डॉ. राजेंद्र चौधरी, समीर दुधगावकर आदीउपस्थित होते.

परभणी - भाजप सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाना स्थगिती देणारे हे महाविकास आघाडीचे सरकार नव्हे तर स्थगिती सरकार आहे. या स्थगिती सरकारला आम्ही स्थगिती देवून परत आम्ही येवू असा दावा करत मराठवाडा पदविधर मतदारसंघाची निवडणुक म्हणजे सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरणार आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय तथा माजी मंत्री सचिव पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (ता.26) परभणीत व्यक्त केला.

औद्योगिक परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालायात पदविधरांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी (ता.26) घेण्यात आला. व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, किशोर कोंडगे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, रामप्रभू मुंडे, विठ्ठलराव रबदडे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, रामकिशन रौंदळे, अजय गव्हाणे, बाळासाहेब भालेराव, संजय रिझवाणी, मधुकर गव्हाणे, राजेश देशपांडे, एन.डी. देशमुख, डॉ. राजेंद्र चौधरी, समीर दुधगावकर आदीउपस्थित होते.

हेही वाचा -  पदवीधर निवडणूक- कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट येथील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रात बदल -

पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खऱ्या अर्थाने तिन तिघाडी व काम बिघाडी असे सरकार आहे. मागील वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. भाजपच्या सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयास स्थगिती देणे हाच एककलमी कार्यक्रम या महा विकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात राबवला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पदविधर मतदारसंघातील निवडणूक ही क्रांतीकारी ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या. केवळ जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे असे सांगत या राजकारणाला आता कुणीही बळी पडणार नाही. ही निवडणुक सत्तातंर घडविणारी निवडणुक आहे असे सांगत त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: This will be an election that will mark the beginning of independence - Pankaja Mundhe claims in Parbhani