परभणीत पेट्रोल नव्वदी पार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

जिल्ह्यात पेट्रोल दरवाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठत मंगळवारी (ता.11) नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रती लीटर 90.29 रूपयांच्या दराने तेल खरेदी करावे लागत आहे.

परभणी- जिल्ह्यात पेट्रोल दरवाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठत मंगळवारी (ता.11) नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रती लीटर 90.29 रूपयांच्या दराने तेल खरेदी करावे लागत आहे.

ज्याप्रमाणे इंधनाचे दर नियंत्रणमूक्त आहेत, त्याप्रमाणे परभणीतील पेट्रोलवाढीवर प्रशासनाने नियंत्रण नाही. सोमवारी पेट्रोल 89.97 रूपये होते तर डिझेल 77.93 प्रति लीटर होते. मंगळवारी पेट्रोलपंप चालकांनी हद्द पार केली. त्याविरूद्ध विरोधी पक्षांकडून सोमवारी (ता.11) जिल्हाबंद ठेवूनही उपयोग झाला नाही. तूर्तास देशात सर्वाधिक महाग पेट्रोल जिल्ह्यात मिळत असून त्यात दिवसेंदिवस वाढच होऊ लागली.

विशेषतः चार वर्षांपूर्वी कच्या तेलाचे जे दर होते, तेच आजघडीला आहेत. उलट तेल डेपोचे अंतर लांब असल्याचे कारण समोर केले जात आहे. तरीही वाहतूक खर्चासह राज्य 
शासनाचा कर आणि व्हॅटचा बोजाही ग्राहकांवर टाकण्यात आला. हे कमी असताना शासन पेट्रोलवर जीसएसटी लावण्यास तयार नाही. ती लावल्यास जवळपास 20 रूपयांची घसरण प्रति लिटरमागे पाहवयास मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Parbhaniat Petrol ninety Cross