परळीत यंत्रणेचे हितसंबंध; मग रणरागिनींनीच अडविले राखेचे टिपर

विशेष म्हणजे या रणरागिनीने चालकाला चपलेचा प्रसाद देत रस्त्यावर सांडलेली राखही साफ करायला लावली
parali
paraliparali

परळी वैजनाथ (बीड): परळीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात तयार होणारी राख हा यंत्रणेसाठी मलिदाच आहे. त्यामुळे राखेची वाहतूक रोखण्याच्या कितीही घोषणा केल्या तरी यंत्रणेचे हितसंबंध आडवे येतात. राज्यकर्त्यांचेही यात संबंध दडलेले असल्याने हा प्रकार थांबायचे नाव घेत नाही. मात्र, रणरागिनी सरसावल्या आणि शंभर राख वाहतूक करणारे टिप्पर थांबवून ठेवल्याची घटना शुक्रवारी (ता. २५) तालुक्यातील पांगरी येथे घडली.

विशेष म्हणजे या रणरागिनीने चालकाला चपलेचा प्रसाद देत रस्त्यावर सांडलेली राखही साफ करायला लावली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. परळी आणि अवैध राख वाहतूक हे समीकरणच झालेले आहे. राखेचा मलिदा सर्वांपर्यंत पोचत असल्याने त्याला अप्रत्यक्ष पाठबळही आहे. त्यामुळे वाहतूकीसाठी तयार केलेले नियम कायम धाब्यावर बसवले जात आहेत. राख वाहतूक करणारे जवळपास ५०० च्या वर हायवा टिप्पर आहेत. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी राख परिसरातील विटभट्ट्यांसाठी वापरली जाते. या राखेची वाहतूक करत असताना हायवा टिप्पर अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त व काही वेळा उघडी वाहतूक केली जाते.

parali
रागातून घर सोडलेल्या युवकाला सुखरूप पोचविले घरी

गुरुवारी (ता.२४) सायंकाळी राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर मधून गतीरोधकाजवळ मोठ्या प्रमाणावर राख पडली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हवेच्या माध्यमातून प्रदूषण झाले. काही घरात ही राख हवेतून उडू लागल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर येवून वाहतूक करणारे हायवा टिप्पर अडवले व ड्रायव्हरला चप्पलने चांगलाच चोप दिला. ऐवढ्यावर न थांबता या सर्व ड्रायव्हरला चक्क रस्त्यावर पडलेल्या राखेची साफसफाई करण्यास भाग पडले. यादरम्यान जवळपास १०० च्या वर हायवा टिप्पर अडवून ठेवण्यात आले. ग्रामीण पोलिसांना माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यांच्या कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी फक्त दोनशे रुपयांची पावती फाडून टिप्पर सोडू लागल्याने या जमलेल्या महिलांच्या असंतोषाला बळी पडावे लागले. या गाड्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी महिलांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com