Udgir News : लोकसभा उमेदवारी बाबत भाजपा जिल्हाध्यक्षांचे मौन

यावेळी खासदार पदाची संधी उदगीरकरांना मिळणार का?
parliament board will decide lok sabha candidate bjp political leader udgir politics
parliament board will decide lok sabha candidate bjp political leader udgir politicsSakal

उदगीर : सध्या उदगीर विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा चालू आहे. शनिवारी (ता.६) भाजपा जिल्हाध्यक्ष खाजगी कार्यक्रमानिमित्त उदगीरात आले असताना पत्रकारांच्या भेटीदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या लोकसभा उमेदवारा वावत त्यांनी मौन धारण करणे पसंत केले. पत्रकारांनी अधिक खोलून विचारले असता हा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या संसदीय बोर्डाने सत्तर वर्षावरील विद्यमान खासदाराना व काही विद्यमान खासदारांना लक्ष देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे यामध्ये लातूरचा नंबर आहे की नाही असा प्रश्न पत्रकारांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांना विचारला असता त्यांनी याचे उत्तर देणे टाळले. त्यामुळे चर्चेला पुन्हा उधान आले असून संसदीय बोर्डाच्या त्या यादीत लातूरचा समावेश असल्याची जोरदार चर्चा चालू झाली आहे.

जर विद्यमान खासदारांना डिच्चु मिळणार असेल तर नवीन खासदार कोण? असा प्रश्न पत्रकारांनी भाजपा जिल्हाध्यक्षांना विचारल्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय भाजपच्या संसदीय बोर्डाचा असल्याचे सांगितले. यावरून लातूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत निश्चितपणे खलबते सुरू असल्याच्या शंकेला वाव मिळतो. मग नवीन उमेदवारी बाबतही चर्चा जोरदारपणे सुरू आहे. लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात समाधानकारक काम केले नाही, मतदारसंघात त्यांच्याविषयी तीव्र नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

भाजपाचा लोकसभेचा उमेदवार बदलण्याचा निर्णय झाला असेल तर यावेळी तरी उदगीरला खासदार पदाची संधी मिळणार का? असा प्रश्न आहे. उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, प्रा पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, नारायण मिरगे असे अनेक उदगीरचे दिग्गज भाजपाचे निष्ठावंत लातूरची लोकसभा लढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून इच्छुक आहेत. यांच्या रूपाने उदगीरकरांना खासदार पदाची संधी मिळते की नाही हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

कमळावर की घड्याळावर हे क्रीडा मंत्र्यांनी ठरवावे..

यावेळी पत्रकारांनी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री देशमुख यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीतुन क्रीडामंत्री संजय बनसोडे हे भाजपाचे उमेदवार आहेत का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की भाजपाच्या कमळ चिन्हाकडून लढायची की घड्याळ चिन्हावर लढायचे हे क्रीडामंत्र्यांनी ठरवावे असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com