माजलगावात अर्धवट जळालेला मृतदेह आढळला 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

माजलगाव (जि. बीड) - शहरातील अशोकनगर भागात नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मृतदेह सोमवारी (ता. नऊ) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 

शहरातील अशोकनगर भागातील नाल्याच्या कडेला अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह सकाळी आढळून आला. 15 वर्षांच्या मुलाचा किंवा मुलीचा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी कचरा असल्याने परिसरातील रहिवाशांना मृतदेह पाहिला नाही. मात्र कुणी तरी अर्धवट अवस्थेत जळालेला मानवी सांगाडा पाहिला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

दरम्यान, नेमका हा काय प्रकार आहे, याचा तपास पोलिस यंत्रणा घेत आहे. हा सांगाडा येथे आला कुठुन, का जाळले? याविषयी तर्कवितर्क सुरू आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com