बसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

हिंगोली - खासगी बसमधून उतरताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आखाडा बाळापूर- वारंगा मार्गावर कुर्तडी पाटीजवळ ही घटना घडली. विनायक प्रमोदराव जोशी हे खासगी बसमधून कुर्तडीकडे जात होते. कुर्तडी पाटीजवळ जोशी उतरत असताना चालकाने अचानक बस पुढे नेली. त्यामुळे ते पडल्याने गंभीर जखमी झाले. नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी व्यंकटेश जोशी यांच्या तक्रारीवरून खासगी बसचालकाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Web Title: Passenger's death due to falling on the bus