मद्यधुंद चालकास प्रवाशांनी बस थांबवायला भाग पाडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

सिल्लोड (जि.औरंगाबाद ) : दारूच्या नशेत तर्र असलेल्या चालकाने भरधाव वेगाने
बस चालवत दुसऱ्या एस.टी. बसला हुलकावणी दिल्याचा प्रकार घडल्यानंतर बसमधील प्रवाशांनी चालकाला गाडी थांबवायला भाग पाडले. त्यानंतर चालक मद्यधुंद असल्याचे दिसले. हा प्रकार बुधवारी (ता. 21) रात्री आठच्या सुमारास घडला.

बुलडाणा आगाराची बस (एमएच-40, वाय-5727) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास औरंगाबाद येथून बुलडाण्याकडे जाण्यासाठी निघाली. बस औरंगाबाद शहराबाहेर निघाल्यानंतर मद्यधुंद चालकाने नियंत्रण सोडून भरधाव वेगाने बस पळविण्यास सुरवात केली. तो गाड्यांना हुलकावणी देत असल्याने प्रवासीही भयभीत झाले. बसमधील काही प्रवाशांनी चालकास सावंगी गावाजवळ बस थांबविण्यास भाग पाडले.

बस थांबल्यानंतर प्रवासी त्याच्याकडे विचारणा करू लागल्यानंतर चालक दारूच्या
नशेत असल्याचे कळाले. त्याच्या खिशाची झडती घेतल्यानंतर खिशामध्ये
देशी दारूची बाटली आढळून आली. या बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी
प्रवास करीत होते. औरंगाबाद ते सिल्लोड रस्त्याची झालेली अवस्था बघता
वेळीच प्रवाशांनी बस थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. प्रवाशांनी औरंगाबाद येथील एस.टी.च्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवून देण्यात आले. बुलडाणा आगाराचा
कर्मचारी असलेल्या चालकाचे नाव दीपक खरात असून, प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करणाऱ्या या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers Stopped Liquor Drunkan ST Driver