

Beed Districts
esakal
पाथरी: उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढल्याने जनजीवन अक्षरशः विस्कळित झाले असून वाढत्या तापमानाचा फटका थेट दुभत्या जनावरांनाही बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून पारा ४३ ते ४४ अंशांवर पोचल्याने दूध उत्पादनात मोठी घट झाली असून अनेक दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.