

Parbhani News
esakal
पाथरी: तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या आठ गावांतील ग्रामस्थ आजही बोट, तराफ्यातून धोकादायक प्रवास करतात. बोट चालकाकडे आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी कोणतीही साधने नसल्याने पाण्यातील हा प्रवास गरजेचा असला तरी जीवावर उठणारा आणि धोकादायक ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील मर्डसगाव येथील बोट दुर्घनेनंतर बोट,तराफ्यातील धोकादायक प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.