राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लातुरात पथसंचलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

लातूर - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजयादशमीच्या निमित्ताने येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. बदललेल्या गणवेशात स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाले होते. शहराच्या पूर्वेकडील भागात हे संचलन करण्यात आले. हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. 

येथील मजगेनगर भागातील महाराष्ट्र विद्यालयातून सकाळी आठ वाजता या पथ संचलनाला सुरवात झाली. सुरवातीला सर्व स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदन केले. त्यानंतर हे संचलन सुरू झाले. भगवा ध्वज घेऊन एक स्वयंसेवक अश्‍वारूढ होता. हे पथसंचलन डाल्डा फॅक्‍टरी, स्क्रॅप मार्केट, कोल्हेनगर, लेबर कॉलनी आदी भागांतून नेण्यात आले. हातात काठ्या, योग्य नियोजन व  शिस्त या संचलनात पाहायला मिळाली. 

या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गणवेशात बदल केला आहे. या बदललेल्या गणवेशात सर्व स्वयंसेवक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांसोबतच बाल स्वयंसेवकदेखील या पथसंचलनात सहभागी झाले होते. या पथसंचलनाचा समारोप महाराष्ट्र विद्यालयातच करण्यात आला. एक तास हे संचलन चालले. हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title: pathsanchalan by rss

टॅग्स