पटनाहुन मुंबईला जाणाऱ्या विमानाचे चिकलठाणा विमानतळार इमर्जन्सी लॅंडिंग

प्रकाश बनकर
रविवार, 2 जून 2019

औरंगाबाद: पटनाहुन मुंबईला जाणाऱ्या गो-एअर विमानच्या इंजिनात बिघाड झाल्यामूळे हे विमान चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी उतरविण्यात आले.

औरंगाबाद पटानाहुन मुंबईकडे जाणाऱ्या गो-एअर विमानाच्या इंजिनात अचानक तांत्रिक बिघाड आल्यामूळे रविवारी (ता.2) सायंकाळी साडे चारच्या दरम्यान आचानकपणे हे विमान चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले.

वैमानिकाने सावधपणे विमानाचे यशस्वी लॉंडिग करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. गो-एअरवेजचे विमान लॅंडिग होताच विमानताळवर रुग्णवाहिका तात्काळ पाठविण्यात आल्या. त्याचबरोबर पोलिसही तेथे पोहचले. विमान उतरल्यानंतर प्रवाशी खाली उतरविण्यात आले नाही.

विमानाच्या इंजिनाची तपासणी करण्यात येत आहे. तापासणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दुरुस्तीपर्यंत विमान चिकलठाणा विमानतळावर राहणार आहे. हा बिघाड मोठा नसुन एक ते दिड तासात हे विमान मुंबईकडे रवाना होण्याची शक्‍यताही इंजिनरिअरनी वर्तवली आहे. दरम्यान, प्रवाशांना चहा पाणी इतर सुविधा गो-एअर कडून पुरविण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patna to Mumbai flight Emergency Landing on Chikaldhana Airport