esakal | बायकोचा पाठलाग करणाऱ्यावर टाकले पेट्रोल अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिस कोठडी, अनैतीक संबंधातून दिले पेटवून

बायकोचा पाठलाग करणाऱ्यावर टाकले पेट्रोल अन्...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : पत्नीसोबत अनैतीक संबंध उघड झाल्याने संतप्त पतीने एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ता. ३१ मार्चच्या दुपारी चारच्या सुमारास बरबडा (ता. नायगाव) येथे घडली. कुंटूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. 

नांदेडच्या फारुखनगर भागात राहणारा व मिस्री काम करणारा शेख अली अशफाक शेख अल्ताफ हुसेन (वय ३८) हा बरबडा परिसरात मिस्‍त्री काम करत असे. यातूनच बरबडा येथील एका महिलेसोबत त्याचे सुत जुळले. त्या भागातील काम संपल्यानंतरही तो नेहमी बरबडा येथे जात असे. हा प्रकार सदर महिलेच्या पतीला समजली. त्याने तिला व त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही. हा राग मनात धरुन त्या महिलेच्या पतीने शेख अली याला घरी बोलावून घेतले. शेख अली हा ता. ३१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास बरबडा येथे गेला.

हेही वाचा - ‘त्या’ हल्ल्यातील जखमीचा मृत्यू
 

सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

यावेळी रागाच्या भरात सदर महिलेच्या पतीने आपल्या एका नातेवाईकाची मदत घेत शेख अलीच्‍या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवून दिले. यात तो पेटल्यानंतर ओरडत घराबाहेर पडला. तेथे काही उपस्थितानी त्याची आग विझविली. यात तो ५१ टक्के भाजला. घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीमखान पठाण यांनी धाव घेतली. लगेच त्याला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

येथे क्लिक करा -  राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनेक कुटुंबांना आधार

नायगाव न्यायालयाने पाठविले पोलिस कोठडीत

शेख अली आशफाक शेख अल्ताफ हुसेन याच्या फिर्यादीवरुन कुंटुर पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी बुधवारी (ता. एक) रात्री बरबडा परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली. एपीआय करीमखान पठाण यांनी या दोघांना नायगाव न्यायालयात गुरूवारी (ता. दोन) हजर केले. प्रथमवर्ग न्यायाधीश वाहब अब्दुल सय्यद यांनी या दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणाचा तपास एपीआय श्री. पठाण करत आहेत.