हिंगोली : वेतन द्या किंवा अवयव विक्रीची परवानगी द्या; संतप्त प्राध्यापकांची मागणी

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

जिल्‍ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे साडेचारशे प्राध्यापकांनी वेतनासाठी निधीची तरतूद करा अन्यथा अवयव विक्री करून उदरनिर्वाहाची परवानगी द्या, अशी मागणी शुक्रवारी (ता.२) केली आहे. 

हिंगोली : जिल्‍ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे साडेचारशे प्राध्यापकांनी वेतनासाठी निधीची तरतूद करा अन्यथा अवयव विक्री करून उदरनिर्वाहाची परवानगी द्या, अशी मागणी शुक्रवारी (ता.२) केली आहे. 

प्राध्यापकांच्‍या या मागणीने प्रशासन अडचणीत सापडले आहे. हिंगोली जिल्‍ह्‍यात 78 कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे साडेचारशे प्राध्यापक ज्ञानार्जनाचे काम करतात. मात्र, मागील अठरा वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयाचा अनुदानाचा प्रश्न रखडल्यामुळे प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनुदानासाठी प्राध्यापक संघटनेने शासनाकडे वेळोवेळी निवेदन सादर केले. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. 

दरम्‍यान, आज हिंगोली जिल्‍हा कृती समितीचे पदाधिकारी एम.टी. गलांडे, सी.एम. वागणे, टी.एम. नाईक, ओ.आर. इंगोले, एस.के. बोरकर, एम.के. डोलारे, यु.एस. शेळके, एस.डी. जाधव, एस.टी. तरकसे, डी.डी. सिरसाट, जी.एन. घुगे, राजेश बगाटे, डी.आर. भुसारे, ए.जे. परसवाळे, एस.के. राऊत, आशिष इंगळे यांच्‍यासह प्राध्यापकांनी जिल्‍हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.

मागील अठरा वर्षांपासून विनावेतन काम करावे लागत आहे. शासनाकडून कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, अद्यापही त्‍याची पूर्तता केली नाही. त्‍यामुळे वेतनासाठी अनुदान द्यावे. अन्यथा अवयव विक्री करून उदरनिर्वाहाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. प्राध्यापकांच्‍या या मागणीने प्रशासन अडचणीत सापडले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay or allow organ sales Demands from professors in Hingoli