बालवैज्ञानीक करणार आकाशगंगेचे निरीक्षण, कुठे? ते वाचाच

file photo
file photo

नांदेड : बालवयात विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, खगोलशास्त्रा विषयी त्यांच्यातील कौशल्य गुण वृद्धींगत होण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आकाशगंगेचे निरीक्षण करणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकरातून जिल्हा परिषद शाळांना नऊ दुर्बीनी भेट देण्यात आल्या आहेत. खगोल अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. १७) नवमीच्या लख्ख प्रकाशात जिल्ह्यातील बालवैज्ञानिक आकाशगंगेचे निरीक्षण करणार आहेत. 

पृथ्वीवरुन आकाशात दिसणाऱ्या सर्वच गोष्टी आकाशगंगेमधील आहेत. रात्रीच्या चमकत्या ताऱ्यांनी खचाखच भरलेल्या विस्तारीत आकाशगंगेला न्याहाळण्यासाठी एका विशिष्ट दुर्बीनचा वापर केला जातो. जिल्हा परिषद शाळांच्या प्रयोग शाळेत बालवैज्ञानिकांनी नाविन्यपुर्ण प्रयोगाला आयाम दिला आहे. विज्ञानातील चिकित्सक गोष्टींचा अभ्यास करुन ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांचे विद्यर्थ्यांमधील वैज्ञानिक आकार घेवू लागला आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक प्रयोगांनी लौकीक मिळवला.

बालवैज्ञानिकांची सहल तुर्तास रद्द

यामध्ये शंभर प्रयोगांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रयोगाला चिकीत्सक पद्धतीने आयाम मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी या बालवैज्ञानिकांची हैद्राबाद येथील राष्ट्रीयस्तरावरील प्रयोगशाळा भेटीसाठी सहल आयोजीत केली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहलीवर निर्बंध जारी करण्यात आल्याने बालवैज्ञानिकांची सहल तुर्तास रद्द करण्यात आली आहे. 

खागोलशास्त्राविषयी आवड

आपल्या अवतीभवती घडणा-या गोष्टींचं कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधीक असते.  त्या उत्सुकतेपोटी विद्यार्थ्यांना आकाशाचे कुतुहल असते. त्यामुळेच चांदण्यांचा, चंद्राचा आपल्यापरीने अभ्यास करायला लागतात. आकाशातल्या चांदण्यांना आणि चंद्राला बघितलं की डोळे सुखावतात त्यामुळे खगोलशास्त्राचा मानवी जीवनाशी निकटचा संबंध आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची प्रेरणा खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना उर्जास्त्रोत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्येही खागोलशास्त्राविषयी आवड निर्माण होत असल्याचे विज्ञान प्रदर्शनातून पुढे येत आहे.  

बालवैज्ञानिकांना आकाशगंगा न्याहळता यावी

जिल्हा परिषद शाळांच्या प्रयोग शाळेत चिकित्सक पद्धतीने विज्ञान प्रयोग सादर करणाऱ्या बालवैज्ञानिकांना आकाशगंगा न्याहाळण्यासाठी अद्यावत दुर्बीन प्रयोग शाळांना भेटी द्याव्या लागतात. जवळपास तशी प्रयोगशाळा नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत दाखल करणे खर्चीक बाब असल्यामुळे बहुतांश बालवैज्ञानिकांचे आकाशगंगा निरीक्षणाचे स्वप्न हे स्वप्नच राहुन जाते. शाळास्तरावर प्रयोग शाळेच्या माध्यमातून बालवैज्ञानिकांना आकाशगंगा न्याहळता यावी व त्यांना खागोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री. काकडे यांनी दुर्बीनची संकल्पना मांडली.

खगोलशास्त्रा विषयी माहिती जाणून घेणार

जिल्हा परिषद मुख्यालयस्तर अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना नऊ दुर्बीनी भेट देण्यासाठी निधी गोळा करण्यात आला. याची सुरवात मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. काकडे यांनी स्वत: पासून केली. त्यामुळे तरतुदीशिवाय नऊ जिल्हा परिषद शाळातील प्रयोग शाळांना दुर्बीन भेट मिळाल्या आहेत. खगोलशास्त्र अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. १७) पाटनुर येथे निवडक बालवैज्ञानिक (विद्यार्थी) आकशगंगेचे निरीक्षण करून खगोलशास्त्रा विषयी माहिती जाणून घेणार आहेत. 

संशोधकवृत्तीलाआयाम मिळाणार
विश्वाची व्याप्ती खुप मोठी आहे.  संपुर्ण विश्वात मानव जात चिकित्सक आहे. विश्वाचे संशोधन करताना विज्ञानाच्या अनेक शाखा खुल्या होतात. त्यासाठी प्रत्येकाने संशोधनाकडे वळले पाहीजे.  जिल्हा परिषद शाळांसाठी असंख्य दुर्बीनी येवू घातल्या आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण होवून त्यांच्यातील संशोधकवृत्तीलाआयाम मिळाणार आहे.  
- श्रीनिवास औंधकर (खगोल अभ्यासक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com