खासदारांच्या कार्यालयापुढे पेन्शनर्सचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

औरंगाबाद - प्रत्येक पेन्शनर्सना महागाई भत्त्यासह दरमहा धर्म 7500 रुपये पेन्शन मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करत शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मछलीखडक येथील संपर्क कार्यालयासमोर सोमवारी ( ता.9) पेन्शनर्सनी आंदोलन केले.

ईपीएस-95 निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समिती औरंगाबाद विभागाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या कर्मचारी निवृत्ती योजना 95 नुसार सेवेतून निवृत्त झालेल्या देशभरातील 186 अस्थापनावरील विविध कार्यालये, कंपन्या, उद्योगधंद्यातील 90 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना ईपीएस-95 या योजनेनुसार दरमहा 500 ते 2250 एवढी अतिशय तुटपुंजी पेन्शन मिळते. यामुळे या महागाईच्या काळात निवृत्त ज्येष्ठ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह महिनाभर होऊ शकत नाही. 

यासाठी 1 एप्रिल 2014 पासून महागाई भत्त्यात किमान साडेसात हजार रुपये पेन्शन सुरु व्हावे यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार म्हणून जिल्ह्यातील 57000 निवृत्त ईपीएस-95 कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी संसदेत अधिवेशनाच्या काळात उपस्थित करावा मांडाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

या आंदोलनात समन्वय समितीचे सुभाष देवकर, प्रदीप कुलकर्णी यांच्या नेतत्वात आंदोलन करण्यात आले.

Web Title: Pensions protests in front of MP's office