...अन्यथा नागरिकांना करावी लागणार पुन्हा पाण्यासाठी भटकंती

Untitled-5.jpg
Untitled-5.jpg

नांदेड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीसाठा ९३ टक्क्यावर पोचला आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने भरभरुन दिल्याने नागरिकांनी सोयीनुसार पाणी बचतीला बगल देत पाण्याची उधटपट्टी सुरु केली आहे. यामुळे ‘आली सुगी फुगले गाल’ अशी आवस्था झालेल्या नागरिकांना टंचाईचा चटका बसल्यानंतर जाग येईल का ? असा सवाल उपस्थित होत आहे. यासाठी आतापासून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जाणकार करत आहेत.

जिल्ह्यात यंदा पावसाने भरभरुन दिल्याने बहुतांश प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा एकूण १११ प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती ६९३.८४ दशलक्ष घनमीटरनुसार ९३ टक्के झाली आहे. मात्र, पाण्याच्या बचतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्यामुळे पाण्याचा वारेमाप वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाला उशिरा सुरवात झाली होती. यामुळे टंचाईचा चटका ग्रामीण भागाबरोबच नागरी वस्त्यांनाही यंदा बसला होता. नांदेडसह, अर्धापूर, लोहा शहराला टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. परिणामी टॅंकरच्या माध्यमातून नागरीकांना पाणी पुरवठा करावा लागला होता. या काळात सर्व स्तरातून पाण्याची बचत करण्याची हाक देण्यात आली. पाण्याचा जपून वापर करण्याबरोबरच कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यासह घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत तसेच कुपनलिकेत मुरविण्याची मोहिम राबविण्यात आली होती.

यानंतरही पावसाने जून, जुलैमध्ये पावसाला सुरवात झाली नसल्याने शहरवासीयांना आठ दिवसाआड पाणी मिळू लागले. या काळात पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची चंगळ झाली होती. प्रशासनाचीही पाणी पुरवठा करताना दमछाक होत होती. अशावेळी मात्र अनेकांनी ‘पाण्याचा जपून वापर केला पाहिजे’ असे ज्ञानवाचक उपदेश सुरु केले होते. यानंतर ऑगष्ट, सप्टेंबर तसेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. यातून पावसाने जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली. पावसाळ्याच्या पाच महिन्यात जिल्ह्यात १०१३ मिलिमीटरनुसार १०६ टक्के पावसाची नोंद झाली.

यानंतरही झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोचला. यामुळे आता आपली सुटका झाल्याचा सुष्कारा सोडत नागरिकांनी पाणी वापराकडे रितसर दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे. आगामी काळात उन्हाळा अल्हाददायक जाईल, अशी शेखी मिरवित अनेकांनी पाणी वापराची मर्यादी आेलाढंल्याचे दिसुन येत आहे.

पाण्याशिवाय पर्याय नाही
‘जल है तो कल है’ अशी म्हण आपल्याकडे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करुन पाण्याची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होत असते. पाण्याचा अवाजवी वापर टाळवा तसेच प्रत्येक थेंबाचा परिणामकारक उपयोग केला जावा, यासाठी जनजागृती केली जाते. परंतु याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आजपर्यंतच अनुभवावरुन पाहावयास मिळते. पाणी अनमोल असल्यसामुळे ते वाचविण्याचे करा प्रयत्न करण्याची गरज अाहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचविण्याचे काम आजवर सातत्याने होत आले आहे. तरीही पाण्याची उधळपट्टी, जलप्रदूषणाचे प्रकार सातत्याने नजरेस पडतात. सर्वांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे आहे.

राज्य शासनाचा पुढाकार
आजपर्यंत राज्य सरकारने जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून जलसाक्षरतेवर भर दिला जातो. त्यास जनतेचा चांगला प्रतिसादही मिळतो. याच अनुषंगाने पाणी बचतीसाठी जलक्षरता राबविण्यात येते. विभाग स्तरावर जलयोध्दांची निवडप्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यात तालुकास्तरावर जलनायक जलदूत निवड समिती गठीत करुन जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे कृषी अधीक्षक, विभागीय जल साक्षरता केंद्रांचे प्रतिनिधी समितीचे सदस्य तर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सदस्य सचिव आहेत. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडील सर्व्हेक्षणानुसार शोषित, अतिशोषित झोनमध्ये येणारी गावे, टँकरग्रस्त गावांची निवड करुन जलसंवर्धनाच्या कामात त्यांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे.

जलसाठ्यात यंदा लक्षणीय वाढ
मागील वर्षी याच काळात जिल्ह्यातील प्रकल्पात ३०७.७० दशलक्ष घनमीटरनुसार ४१.२६ टक्के पाणीसाठा होता. यंदा पावसाळ्याच्या शेवटी पावसाने जोर लावल्यामुळे जिल्ह्यातील दोन मोठे, नऊ मध्यम, ८८ लघू, आठ उच्च पातळी बंधारे तसेच चार कोल्हापुरी बंधारे, अशा एकूण १११ प्रकल्पातील पाणीसाठा ४९३.८४ दशलक्ष घनमीटरप्रमाणे ९३.०३ टक्के झाला आहे.

प्रकल्पनिहाय पाणीसाठ्याची स्थिती
प्रकल्प.................दलघमी.................टक्केवारी
विष्णुपुरी...............८०.७९....................१००
मानार.................१३८.२१....................१००
मध्यम प्रकल्प........१३८.९८..................९९.९३
उच्च पातळी बंधारे....१७०.८३..................९०.००
लघू प्रकल्प.......... १५९.४५..................८३.७२
कोल्हापुरी बंधारे..........५.५८..................७४.९८
एकूण..................६९३.८४..................९३.०३

जिल्ह्याशेजारील प्रकल्पांतील पाणीसाठा
उर्ध्व पैनगंगा...........७२२.२७...................७५.००
येलदरी.................७९३.९९...................९८.०५
सिद्धेश्‍वर.................५४.००...................६६.७३

पाच वर्षाच्या काळात एकदा चागंला पाऊस होतो. अशा काळात पाण्याचे व्यवस्थापण करणे गरजेचे असते. सुकाळाच्या काळात पाण्याच्या अती वापराने ते आपल्यापासुर दुर जाते. अशावेळी पाण्याची बचत केली तर ते भविष्‍य काळासाठी उपयोगी येते. यासाठी पाण्याची बचत आणि जतन करणे आवश्‍यक आहे.- प्रा. परमेश्‍वर पोळ, जलतज्ज्ञ, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com