esakal | कार्य करणारे व त्यांची दखल घेणारी माणसं मोठी असतात- डॉ. हनुमंत भोपाळे
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

असंख्य माणसं ऐनकेन प्रकारे आपले योगदान देत आहेत. विविध पक्षांत देखील एकजूट दिसून येते, ही बाब आम्ही कठीण समयी एकजूटीनेच राहतो, ही बाब भारतीय राजकारणी माणसांनी दाखवून दिली आहे.

कार्य करणारे व त्यांची दखल घेणारी माणसं मोठी असतात- डॉ. हनुमंत भोपाळे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : हजारो हात कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रयत्नशील आहेत. त्या सर्वांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे. राजकारणी माणसंही किती कष्ट घेतात, याची जाणीव समाजाला या निमित्ताने होतं आहे. असंख्य माणसं ऐनकेन प्रकारे आपले योगदान देत आहेत. विविध पक्षांत देखील एकजूट दिसून येते, ही बाब आम्ही कठीण समयी एकजूटीनेच राहतो, ही बाब भारतीय राजकारणी माणसांनी दाखवून दिली आहे.

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. शरद पवार हे सतत लक्ष ठेवून आहेत. मार्गदर्शन आणि जनतेच्या हितासाठी मागण्या करीत आहोत. आम्ही तुमच्या सोबत आहोत असे शासनाला सांगत आहेत. त्यांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाचे कौतुक केले आहे. खरंच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत

पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेडमध्ये सातत्याने बैठका घेऊन प्रशासनाला मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहेत. केंद्र सरकारला विनंती करून जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी विदेशात सिंगापूर येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली आहे. तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि जिल्ह्यातील सर्वच आमदार त्यांच्यापरीने काम करुन समन्वयाने वागत आहेत.

हेही वाचा - `या’ कर्मचाऱ्यांच्या मानसिक तणावात होतेय वाढ

काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर शाबासकीची थाप

ही बाब लोकशाही प्रगल्भ झाली याचे दर्शन घडवते तसे राष्ट्रीय ऐक्याचेही दर्शन घडवते. काम केवळ पैसे दिल्यानेच होतात असे नाही. पैसासोबत प्रेम, प्रोत्साहन दिले, कार्याची दखल घेतली. आम्ही तुमच्या सोबत आहोत, याची जाणीव करून दिली तर काम करणाऱ्या माणसाला हत्तीचं बळ येते. माणसं झपाटून काम करतात. सतत काम करणा-या वरिष्ठांकडून कौतुक झाले तर अधिक परिणामकारक ठरते. सर्वसामान्य कुटुंब जन्मलेल्या, कार्याच्या बळावर पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतलेल्या नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यातील छाया नर्सला स्वत: फोन करून कोरोनाला हटविण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. अभिनंदन केले, उत्साह वाढविला. संवादाची सुरूवात मराठी भाषेतून करून भाषेचाही गौरव केला. काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पाणी, रक्त जसे तयार करता येतं नाही तसे प्रेम विकत मिळत नाही.

कामाची कदर होते हा संदेश दिला

विकत न मिळणारे प्रेम, उत्साहरूपी ऊब मिळाल्याने विलक्षण आनंद होतो. कामाचा शिण दूर जातो अन् कार्याला बळ मिळते. ही ऊब देण्यासाठी मनाचा मोठेपणा, माणसांविषयी अतीव प्रेम, जिव्हाळा, माया मनात असावी लागते. नरेंद्र मोंदी यांनी केलेल्या ह्या फोनने एका व्यक्तीचे बळ वाढविले नाही, तर तमाम काम करणाऱ्या जनतेचे बळ वाढविले. कामाची कदर होते हा संदेश दिला. याचा अर्थ काम करणाऱ्या माणसांनी प्रेम, प्रोत्साहन मिळाले तरच काम करावे असे मात्र नाही. कोत्या मनाची माणसं विधायक कार्याचे कौतुक करू शकत नाहीत. रत्नपारखी मिळाला नाही म्हणून रत्नांनी आपलं रत्नत्व सोडायचं नसते. झुडपाकडून सावलीची अपेक्षा करायची नसते. आज असंख्य माणसं माणसांच्या प्रतिमेच्या संपर्कात आलो तर कोरोना होईल म्हणून घाबरत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कोरोना झालेल्या व्यक्तीची सेवा करणाऱ्या माणसांचे कार्य आणि धैर्य नोंद घेण्यासारखे आहे. 

येथे क्लिक करा - अखेर तेलंगणातील ‘त्या’ ३० मजुरांची उपासमार थांबली

सर्वच स्तरातील कर्तबगार व्यक्ती

पोलिस, डॉक्टर, अत्यावश्यक सेवा देणारी माणसं, कोरोनाची लस शोधून काढण्यासाठी स्वत:ला प्रयोगशाळेत बंदिस्त करून घेतलेले शास्त्रज्ञ, सफाई कर्मचारी, समाजातील प्रत्येक घटनाघडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारे पत्रकार, राजकारणात सक्रिय असलेली माणसं, समाज सेवक                 साहित्यिक, चित्रकार, गायक, प्रबोधनकार, आर्थिक योगदान सर्व सन्मानीय आदींचे कार्य कौतुकास्पद आहे.

शब्दांकन- प्रा. डाॅ. हनुमंत भोपाळे, नांदेड.