esakal | अखेर तेलंगणातील ‘त्या’ ३० मजुरांची उपासमार थांबली
sakal

बोलून बातमी शोधा

nanded news

शोधात पुणे, मुंबई शिवाय जवळच्या तेलंगणा राज्यात चार महिण्यासाठी स्थलांतरीत होतात. लोहा तालुक्यातील रुपाला तांड्यावरील जवळपास तीस नागरीक सहकुटुंब तेलंगणा राज्यात चार महिण्यापूर्वी स्थलांतरीत झाले होते.

अखेर तेलंगणातील ‘त्या’ ३० मजुरांची उपासमार थांबली

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शेकडो मजुर कामाच्या शोधात पुणे, मुंबई शिवाय जवळच्या तेलंगणा राज्यात चार महिण्यासाठी स्थलांतरीत होतात. लोहा तालुक्यातील रुपाला तांड्यावरील जवळपास तीस नागरीक सहकुटुंब तेलंगणा राज्यात चार महिण्यापूर्वी स्थलांतरीत झाले होते. परंतु पोटाची खळगी भरण्याच्या नादात त्यांना लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरस याबद्दल कल्पानाच आली नाही. जेव्हा संपूर्ण भारत लॉकडाऊन झाले तेव्हा मात्र या कुटुंबियांची पुन्हा उपासमार सुरु झाली. 

कोरोनाच्या भितीने तेलंगणातील कुणीच त्यांची मदत करत नव्हते. पाणी सुद्धा पिण्यासाठी मिळत नव्हते. विशेष म्हणजे यात दोन गरोदर मतांचाही समावेश आहे. काय करावे कळेनासे झालेल्या या नागरीकांनी गावातील बाबुराव केंद्रे यांच्याशी संपर्क साधला आणि चार दिवसांपासून होत असलेल्या उपासमारीची माहिती दिली. परंतु बाबाराव हे देखील परिस्थितीपुढे हातबल होते. मात्र त्यांना गावचे पाण्याचे संकट दूर करण्यासाठी धावून आलेले दिपक मोरताळे यांची आठवण झाली. केंद्रे यांनी मोरताळे यांना फोन करुन गावातील तीस मजूर तेलंगणा राज्यातील गंगाराम तांडा, झिलूलपाड, खमम येथे तीस मजूर आडकले असून चार दिवसांपासून त्यांची उपासमार सुरु असल्यची माहिती दिली.

हेही वाचा- कोरोना : रक्त संकलानासाठी गोदावरी धावली

चार दिवसापासून सुरु होती उपासमार-
दीपक मोरताळे यांनी तेलंगणातील त्यांच्या मित्रांशी संपर्क साधला व परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या मित्रांनी तेलंगणाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचा भ्रमणध्वणी मिळवून देत मोठी मदत केली. त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांना रुपाला तांडा (ता. लोहा जिल्हा नांदेड) येथील ३० मजूर मिरची तोडणीसाठी तेलगांना राज्यात गंगाराम तांडा, झिलूलपाड, खमम येथे मागील दोन महिन्यापासून कामासाठी आल्याची माहिती दिली. कोरोना लॉकडाऊनमुळे त्यांचे वापस येण्याचे मार्ग बंद झाले. अन्न धान्यही भेटेना, गरोदर महिलांना औषध पाणी मिळेना. याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांची माहिती मिळताच आर्ध्या तासात यंत्रणा कामास लागली. 

आर्ध्यातासात मदत पोहचली 
माहिती मिळतीच तेलंगणाचे जिल्हाधिकारी कार्यालयातुन एकनूरचे तहसीलदार श्री. झुलुलपाड यांचा मोरताळे यांना फोन आला. त्यांनी त्या मजुरांच्या लोकेशनची माहिती घेतली. एक तासात नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, परिचारिका, पोलिस निरीक्षक यांचा फौजफाटा मजुरांच्या पालावर गंगाराम तांडा, झिलूलपाड पोहचला. त्यांना जागेवर धान्य व आवश्यक गोळ्या औषधी दिल्या.

हेही वाचले पाहिजे- हिंगोलीत सुरक्षीत अंतरासाठी दुकांनांसमोर आखली वर्तुळे

आधिकाऱ्यांचा फौजपाटा पाहुन गावकरीही चक्रावले
गरोदर महिलांना येत्या सोमवारी (ता. ३० मार्च २०२०) सकाळी दवाखान्यात शासकीय वाहनाने नेऊन सर्व तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एवढी शासकीय यंत्रणा त्या गावात कधीच आली नव्हती. त्यामुळे गावकरीही हे कसे झाले? म्हणून चक्रावून गेले होते. गुलाब राठोड, चव्हाण व इतर मजुरांनी दिपक मोरताळे व बाबुराव केंद्रे यांनी अतिशय अवघड परिस्थितीत परराज्यात असताना देखील मदत केली त्याबद्दल धन्यवाद दिले.

आणि सर्वकाही ठिक झाले​
बाबुराव केंद्रे यांनी गावातील मजुर तेलंगणात अडकल्याची माहिती दिली. माझे तेलंगणातील वर्गमित्र मनीष उत्तरवार यांना वरांगल भागातील मित्रास मदत कशी करता येईल? याची चौकशी केली. त्यांनी लॉकडाऊनमुळे फक्त प्रशासकीय यंत्रणाच मदत करू शकेन असे सांगितले. मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आणि सर्वकाही ठिक झाले त्या मजुरांची उपासमार थांबली.
- दिपक मोरताळे (जलस्वराज्य परिवार, नांदेड)

loading image