प्राणिसंग्रहालयाची मान्यता अबाधित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली. महापालिकेच्या शिष्टमंडळाने बुधवारी दिल्लीत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाचे सचिव मिश्रा यांची भेट घेतली. यावेळी तासभर झालेल्या चर्चेअंती मिश्रा यांनी ही स्थगिती दिली तसेच महापालिकेला नियोजित सफारी पार्कचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले . 

अपुरी जागा आणि सोयी-सुविधांचा अभाव यामुळे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने 26 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती. त्याविरोधात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन अपील दाखल केले. या शिष्टमंडळात महापौर नंदकुमार घोडेले उपमहापौर विजय आवताडे सभागृहनेता विकास जैन स्थायी समिती सभापती राजू वैद्य विरोधी पक्षनेते जमीर कादरी तसेच उपायुक्त वसंत निकम आणि प्राणी संग्रहालय संचालक विजय पाटील यांचा समावेश होता.

शिष्टमंडळाने मिश्रा यांच्या बरोबरच वन व पर्यावरण सचिव ए. के. नाईक यांचीही भेट घेऊन निवेदन सादर केले.  प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास मिश्रा यांनी तातडीने स्थगिती दिली असून, त्याबाबतचे अधिकृत पत्र आठवडाभरात महानगरपालिकेला प्राप्त होईल असे महापौर घोडेले यांनी सांगितले.

Web Title: permission for zoo is Unrestricted