मुस्लिम आरक्षणासाठी याचिका- इम्तियाज जलील

मुस्लिम आरक्षणासाठी याचिका- इम्तियाज जलील

औरंगाबाद : गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. याच धर्तीवर मुस्लिम समाजातील 52 समुहांना पाच टक्के आरक्षण जाहिर करावे. या मागणीसाठी ‘एमआयएम’ कडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी शनीवारी (ता. 05) येथे पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई उच्च न्यायलयात मुस्लिम आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत माहिती देताना, आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले कि, मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या आंदोलनाला मुस्लिम समाजानेही पाठिंबा दिला होता. मुस्लिम समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेंसच्या शासनाच्या काळात, केंद्रात सच्चर कमीटी, रंगनाथ मिश्रा कमिटी तर राज्यात मागासवर्गीय कमीटी सह महेमुद उर रहेमान कमीटीची स्थापन करण्यात आली.

या सर्व कमीट्यांनी दिलेल्या अहवालात मुस्लिम समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही मागासवर्गीयांपेक्षा खालावली असल्याचे  अहवालात नमुद केले आहे. या अहवालावर तत्कालिन काँग्रेंस राष्ट्रवादीकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर सध्याच्या सत्ताधारी शिवसेना भाजपा सत्ताधाऱ्यांनीही मुस्लिमांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com