बाजार समितीजवळील पेट्रोलपंप अडकला एनओसीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

एनओसीच्या कामासाठी समितीतर्फे एक स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे. लवकर ही एजन्सी नेमुन पंपाचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. 

औरंगाबाद - बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहे. यातच बाजार समितीत सप्टेंबर मध्ये सत्तांतर झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल पंप सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास पणन महामंडळाने मान्यता दिली. पंपासाठी आवश्‍यक असेल्या 11 एनओसी प्रक्रीयेसाठी बाजार समितीस मोठे कष्ट करूनही मिळत नाही. एनओसीच्या कामासाठी समितीतर्फे एक स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे. यामुळे एक ट्रेंडर काढण्यात आले आहे. लवकर ही एजन्सी नेमुन पंपाचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. 

बाजार समितीच्या प्रवेशद्वारा जवळ हे पंप सुरु करण्यात येणार आहे. याच फायदा जाधववाडी, मिसारवाडी, आरतीनगर, सनी सेंटर, पिसादेवी, पोखरी, मांडकी, गोपाळपुर, पळशी तांडा, आडगाव माहुली, आडगाव या गावाना होणार आहे. या गावातील नागरिकांना पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी शहरात यावे लागते. हा पंपामुळे बाजार समितीचे उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता.त्यानंतर पणन मंडळानेही मंजुरी दिली. पंपास हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची मान्यता दिली आहे.

आता केवळ पोलिस आयुक्‍त, अग्नीशमन दल, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदुषण नियमक मंडळ, पीडब्ल्युडी विभाग, महावितरण यासह अन्य काही विभागाच्या परवनगीची प्रतिक्षा आहे. बाजार समितीतर्फे या विभागांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यासाठी नेमण्यात येणारी एजन्सी आता या सर्व एनओसी मिळवून देणार आहे. दोन दिवसापुर्वी याविषयीचे ट्रेंडर काढण्यात आले आहे. आठवड्याभरात संचालकमंडळासमोर हे ट्रेंडर उघडून एजन्सीची नेमणुक होईल, असेही सभापती पठाडे यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Petrol pump near the market committee was closed due to NOC