Phulambri News : फुलंब्री तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा तीन दिवस संप

ग्रामीण भागात गावगाडा थांबला : ग्रामपंचायतचे पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा तीन दिवस संप
phulambri 71 gram panchayat officials and workers on strike for 3 days
phulambri 71 gram panchayat officials and workers on strike for 3 days Sakal

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, सरपंच उपसरपंच व सदस्य आपल्या विविध मागण्यासाठी 18 ते 20 डिसेंबर हे तीन दिवस संपावर गेल्यामुळे तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीना कुलूप लावल्याने लॉक झाले आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील गावगाडा ठप्प झाला आहे. तीन दिवस ग्रामपंचायत बंद असल्याने गाव पातळीवरील नागरिकांना विविध कामासाठी आल्या पावली परत जावे लागले. फुलंब्री तालुक्यात सुमारे 92 गावे असून 71 ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास गाडा सुरू आहे.

गाव पातळीवर असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजना तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामपंचायतचे कर्मचारी व पदाधिकारी करीत असतात.

मात्र ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या शासन दरबारी प्रमुख मागण्या प्रलंबित असल्याने या सर्वांनी एकत्रित येऊन 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर हे तीन दिवस संप पुकारल्याने गाव पातळीवरील विकास कामे ठप्प झाले आहे.

दरम्यान ग्रामपंचायत संगणक परिचालक मागील गेल्या महिन्याभरापासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर गेलेले आहे. आता त्यांच्यासोबत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवकांनी आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारीही संपात सहभागी झाल्याने तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीला कुलूप लागले आहे. परिणामी गाव पातळीवर राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रमाणपत्रासाठी आल्या पावली परत जावे लागले.

ग्रामसेवक संघटनेच्या मागण्या

• ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करा.

• ग्रामसेवकांच्या अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातील शिफारसीची अंमलबजावणी करा.

• ग्रामसेवक पदाची सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून शैक्षणिक अहर्ता कोणत्याही शाखेची पदवी ग्राह्य धरणे.

• महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 49 च्या नियमात सर्व जिल्हा परिषदेच्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करणे.

• विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढवणे

• 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती दिलेले मात्र एक नंबर 2005 पूर्वी भरती प्रक्रिया चालू झालेल्या ग्रामसेवक यांना सरसकट जुनी पेन्शन द्यावी.

• कंत्राटी पद्धतीची ग्रामसेवक भरती बंद करणे.

• शिक्षकाप्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधित्व मिळणे.

ग्रामरोजगार सेवकांच्या प्रमुख मागण्या

• ग्रामरोजगार सेवकांना दरमहा फिक्स मानधन देण्यात यावे.

• सन 2011 चा अर्धवेळ शासन निर्णय रद्द करण्यात यावा.

• ग्रामरोजगार सेवकांना दरमहा मानधन वैयक्तिक खात्यावर देण्यात यावे..

संगणक परिचालकांच्या मागण्या

• सध्या ग्रामविकास विभागास जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या अभिप्राय नुसार ग्रामपंचायतच्या सुधारित फाइल वित्त विभागास त्वरित पाठवून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे.

• कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत वीस हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे.

• नव्याने सुरु करण्यात आलेली टारगेट सिस्टम रद्द करण्यात यावी.

• पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यात यावी.

• नियुक्ती झालेल्यांना न मिळालेले मानधन त्वरित देण्यात यावे.

सरपंच, उपसरपंच व सदस्याच्या मागण्या

• गाव पातळीवरील ग्रामपंचायतच्या सरपंचांचे अधिकार वाढविण्यात यावे.

• सरपंचांच्या मानधनात वाढ करा.

• आपले सरकार सेवा केंद्रासाठी परस्पर निधी कट न करता ग्रामपंचायतीला देऊन सरपंचांना अधिकार द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com