Phulambri News : कारमध्ये घरगुती गॅस भरतांना सिलेंडरचा स्फोट

फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे बस स्थानकावर ओमनी कार मध्ये घरगुती गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याची घटना सोमवारी (ता.१५) रोजी घडली आहे.
phulambri domestic gas explosion while filling
phulambri domestic gas explosion while fillingSakal

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे बस स्थानकावर ओमनी कार मध्ये घरगुती गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याची घटना सोमवारी (ता.१५) रोजी घडली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दुकान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. यात लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक अधिक माहिती अशी की, रीधोरा येथील ओमनी कार चालक अली खाँ अजिद खाँ पठाण हा ओमणी क्रमांक एम.एच.१५ डि.म.५१५४ या कार मध्ये निमखेडा येथील नागरीकांकडू घरघूती गैस विकत घेवून गाडी मध्ये भरत असताना अचानक स्फोट झाला.

या स्फोटाचा आवाज एवढा भयंकर होता की अख्खे गाव या स्फोटाने हादरले. त्यामुळे ग्रामस्थांनमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा स्फोट झाल्यानंतर जळते गैस सिलेंडर वर उडून सरपंच नामदेव खेत्रे यांच्या शितपेयाच्या दुकानावर पडले.

त्यामुळे त्यांच्या दुकानाला आग लागली. यामध्ये दोन मोबाईल, टिव्ही, फ्रीज, गाडीचे टायर, कपडे जळून खाक झाले आहे. या स्फोटामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सिलेंडर घरावर पडताच त्यांच्या दुकानातील व्यक्ती मागच्या दरवाजाने पळाल्याने मोठी जिवीत हानी टळली.

तर उन्हाळ्याचे दिवस असल्याने निमखेडा बसस्थानकावर नागरिकांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश बागल करीत आहे.

दुकानाततील फ्रिजचाही झाला स्फोट

निमखेडा येथे बस स्थानक परिसरामध्ये ओमिनी कार मध्ये घरगुती गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन सदरील सिलेंडर हे सरपंच नामदेव खेत्रे यांच्या शितपेयच्या दुकानात घुसले. त्यावेळी या सिलेंडरच्या आगीत घरात ठेवलेले फ्रिज, एल ई डी टिव्ही, टायर, घरावरील जुने पत्रे आदी साहित्य जळून खाक झाले. घरात असलेल्या फ्रिजच्या गॅसचाही स्फोट झाल्याने मोठा आगीचा भडका उडाला होता.

तालुक्यातील निमखेडा येथील गॅस सिलेंडर फुटल्याची घटना घडली आहे. याची संपूर्ण चौकशी तहसीलचे पथक करणार आहे. त्यानंतर चौकशी अंती नियमानुसार संबंधितावर वाहन कायदा व घरगुती गॅस कायदा नुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

- डॉ.कृष्णा कानगुले, तहसीलदार फुलंब्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com