Phulambri News : सात हजार मजुरांचे साडेनऊ कोटी थकले..!

रोजगार हमी योजनेच्या मजुरांना पैसे मिळेना.
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Schemesakal

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेत वैयक्तिक सिंचन विहीर, घरकुल, गायगोठे, रेशीम उद्योग काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रोजगार हमी योजनेत 60 : 40 चा सरासरी असल्याने मजुरांवर मोठ्या प्रमाणात कामे केली जाऊ लागली आहे. तालुक्यातील सात हजार 67 मजुरांचे सात मस्टरांचे सुमारे नऊ कोटी 45 लाख 35 हजार 259 रुपये थकीत असल्याने मजुरांची उपासमार होऊ लागले आहे.

फुलंब्री तालुक्यात एकूण 92 गावे असून 71 ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेचे कामे गावागावात सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक सिंचन विहीर, घरकुल योजनेची घरे, जनावरांचे शेड, रेशीम तुती लागवड, मातोश्री पांदण रस्ते, फळबाग लागवड आदी सुमारे 939 कामे तालुक्यात सुरू आहे. या कामावर सात हजार 67 मजूर काम करीत आहे.

मात्र मागील गेल्या दीड महिन्यापासून मजुरांचे मजुरीचे पेमेंट थकल्याने मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. मजुरांचे पैसे मजुरांना मिळत नसल्याने मजूर पंचायत समिती कार्यालयात चकरा मारू लागले आहे. ऑनलाइन हजेरी पत्रक टाकल्यानंतरही मजुरांचे पेमेंट वेळेवर येत नसल्याने मजुरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तुमचे मस्टर ऑनलाईन केलेले आहे वरतून तुमच्या खात्यात पैसे येईल असे उत्तर पंचायत समिती कार्यालयातील रोहयोच्या विभागातील कर्मचारी देत आहे.

तालुक्यातील मजुरांचा तपशील -

• कामावर असलेले एकूण मजूर संख्या : 7067

• मजुरांचे एकूण पेंडिग मस्टर : ०७

• मजुरी पेंडीग असलेले दिवस : ४९

• एका मजुराची एका दिवसाची सरासरी हजेरी : २७३

• मजुरांची एकूण थकीत रक्कम : ९ कोटी ४५ लाख ३५ हजार २५९

पंचायत समिती अंतर्गत रोहयोचे सुरू असलेली कामे -

• वैयक्तिक सिंचन विहीर एकूण कामे : ४६७

• बांधावरील वृक्ष लागवड एकूण कामे : ३०१

• घरकुल योजनेची एकूण कामे : ४८

• एकूण जनावराचे शेडची कामे : २४

• मातोश्री पांदण रस्त्याची कामे : १४

• पेवर ब्लॉकची कामे : ०२

• सिमेंट रस्त्याची कामे : ०४

• बकरीच्या शेडची कामे : १२

• कुक्कुटपालन शेडची कामे : ०२

कृषी विभागाअंतर्गत रोहयोची कामे -

• फळबाग लागवड : ०६

रेशीम विभागांतर्गत रोहयोची कामे -

• तुती लागवड : ०७

बांधकाम विभाग अंतर्गत रोहयोची कामे -

• मातोश्री पांदण रस्त्याची कामे : ०१

• रोहयोअंतर्गत सुरू असलेली एकूण कामे : ९३९

• रोहयो अंतर्गत काम करणारे एकूण मजूर : ७०६७

• मजुराची एकूण थकीत रक्कम : ९,४५,३५,२५९

लालवन ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीत जनावरांच्या गोठ्यासाठी काम केलेले आहे. 19 ऑक्टोबर रोजी आम्ही मस्टर दाखल केले. आज जवळपास दीड महिना उलटून गेला तरी अजून मजुरी मिळालेली नाही. प्रशासनाने आमच्या मजुरीचे पैसे तात्काळ आमच्या खात्यावर टाकावे.

- गीताबाई संजय राजपुत, लाभार्थी मजूर, लालवन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com