बौद्धिक श्रम करणाऱ्यांसाठी शारीरिक श्रमही तितकेच महत्त्वाचे

फोटो
फोटो

परभणी : ज्या अधिकारी किंवा इतरांना बौद्धिक कामे करण्यासाठी २४ तासांतील जवळपास दहा ते ११ तास कामासाठी एकाच ठिकाणी बसावे लागते, अशा लोकांसाठी शारीरिक श्रमही तितकेच महत्त्वाचे आहेत. जेणे करून त्याचे शरीर फिट राहिल असा गुरुमंत्र परभणीच्या प्रशासनात काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिला आहे.


महसूल, पोलिस, डॉक्टर व इतर कार्यालयांत उच्चपदांवर काम करणारे अनेक अधिकारी दररोज सकाळी परभणीच्या कृषी विद्यापीठात व्यायामासाठी येत असतात. त्यांची व्यायामातील एकाग्रता पाहून सर्वांनाच नवल वाटावे असे आहे. सकाळी उठून व्यायाम करणे ही सर्वांसाठी चांगली सवय म्हणता येईल.

दिवसभराच्या कामाचा ताण व थकवा घालविण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने या काळात व्यायाम केल्याने त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सर्वच जण व्यायामाच्या विविध पद्धतींचा अवलंब करतात. त्यात जिमला जाणे, फिरणे, धावणे, उड्ड्या मारणे, सायकलिंग करणे असे एक ना अनेक प्रकार आपल्याला समोर असतात. परंतु, प्रशासकीय कामात व्यस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांनाही स्वतःच्या तब्यतीकडे लक्ष देणे गरजेचे असते.

परभणीतील उच्चपदस्थ अधिकारी याला अपवाद

परभणी शहरातील अनेक अधिकारी हे सकाळी उठून व्यायामासाठी निरनिराळ्या ठिकाणी जातात. परंतु, ज्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने लोकांशी संपर्क येतो. ज्यांना सर्वच जण ओळखतात अशा अधिकाऱ्यांना व्यक्तिगत आयुष्य जगण्यासाठी जेव्हा बाहेर पडावे लागते, तेव्हा मात्र कधी -कधी त्रास होतो. त्यामुळे अनेक वेळा चर्चेतील अधिकारी कार्यालयाशिवाय सहसा कुठे दृष्टीस पडत नाहीत. परंतु, परभणीतील उच्चपदस्थ अधिकारी याला अपवाद आहेत. परभणीतील अनेक अधिकारी भल्या पहाटे उठून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात व्यायामासाठी आलेले दिसून येते. ज्या लोकांना जास्त वेळ एकाच ठिकाणी खुर्चीत बसून राहावे लागते, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळी व्यायाम जास्त गरजेचा असतो. यातून दिवसभराची एनर्जी मिळण्यास मदत
होते. त्यामुळे या परिसरात दररोज कुणी सायकलिंग करताना, कुणी धावताना, तर कुणी चालताना दिसतो.




एनर्जी मिळते
मी सकाळी साडेपाच वाजता उठतो. दहा किलोमीटरची दहा मॅरॉथानही केली आहेत. शारीरिक श्रम करावेच. त्यातून आपल्याला एनर्जी मिळते.                      डॉ. अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी, परभणी

मानसिक व शारीरिक दृष्ट्या मनुष्य मजबूत
तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यांना सकाळी व्यायामाची गरज असते. त्यामुळे मानसिक व शारीरिक दृष्ट्या मनुष्य मजबूत बनतो.
- विद्याचरण कडवकर, तहसीलदार, परभणी

मिश्र पद्धतीचे व्यायाम गरजेचा
कामाचा ताणतणाव असतो. त्यामुळे मिश्र पद्धतीचे व्यायाम करणे गरजेचे आहे. आम्ही पोलिस दलात असल्याने याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.
- दीपक दंतुलवाड, पोलिस उपाधीक्षक, क्राईम ब्रॅंच,
परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com