Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरने गणेश आगमन मिरवणुकीत घुसून भीषण अपघात; दोन ठार, सात जखमी, पिंप्री राजा गावावर शोककळा
Trailer crashes into Ganesh procession in Pimpri Raja; two killed, seven injured.

Trailer crashes into Ganesh procession in Pimpri Raja; two killed, seven injured.

Sakal

Updated on

बाळासाहेब काळे

करमाड : पिंप्री राजा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे सोमवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास गणेश आगमन मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर सात जण जखमी झाले. विठ्ठल रामभाऊ जाधव (वय ३८) आणि रमेश लहू बनसोडे (वय ४५, दोघेही रा. पिंप्री राजा) अशी मृतांची नावे आहेत.जखमींमध्ये गणेश सुरेश पवार (वय ३२) व त्यांचा सहा वर्षांचा मुलगा, प्रद्युम्न पाखरे (वय ३२, रा. पिंप्री राजा) आणि समाधान दादाराव सरोदे (वय २८, रा. डायगव्हाण, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com