Phulambri News : फुलंब्रीच्या धरणातून आठ विद्युत पंपासह पाईप जप्त

नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्या पथकाची कारवाई
Pipes with eight electric pumps seized from Phulambri dam action Nagar Panchayat Chief Rishikesh Bhalerao
Pipes with eight electric pumps seized from Phulambri dam action Nagar Panchayat Chief Rishikesh BhaleraoSakal

फुलंब्री : फुलंब्री शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी 30 जून पर्यंत नगरपंचायतीने नियोजन केलेले आहे. मात्र या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीसाठी अवैध पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयासह नगरपंचायत मध्ये दाखल झाले होत्या.

त्याच अनुषंगाने तहसील कार्यालय व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने धरण परिसरात अवैध पाणी उपसा करणारे आठ विद्युत पंपासह पाईप जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्या पुढाकारातून शनिवारी (ता.30) मार्च रोजी करण्यात आली.

फुलंब्री तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट प्रशासनासमोर मोठे आहे. धरणामध्ये असणाऱ्या मुबलक पाण्यातून अवैध मार्गाने विद्युत पंप टाकून पाणी उपसा सुरू असल्याने भूगर्भातील पाणी पातळी खालवत होती.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने नगरपंचायत व तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याच अनुषंगाने तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्या पुढाकारातून शनिवारी सकाळी फुलंब्री येथील धरण परिसरात अवैध पाणी उपसा सुरू असणारे आठ विद्युत पंपसह पाईप जप्त केले आहे.

या कारवाईमध्ये मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्यासह नायब तहसीलदार उद्धव उडान, तलाठी अरुण पंडित, नगरपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी भगवान होनमाळी, गजानन तावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

फुलंब्री येथील धरण परिसरातून 30 जून पर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र धरणात विद्युत पंप टाकून अवैध पाणी उपसा सुरू असल्याने भूगर्भातील पाणी पातळी खालावत लागले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विद्युत पंप व पाईप जप्तीची कारवाई करण्यात आली. धरणातून अवैध उपसा करणाऱ्यावर यापुढेही कडक कारवाई केली जाणार आहे.

- ऋषिकेश भालेराव, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपंचायत फुलंब्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com