पीआयची बंदूक गहाळ; पोलिस ठाण्यात नोंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पोलिस खात्यात असताना वादग्रस्त व सध्या निलंबीत असलेले पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रऊफ यांची परवानाधारक बंदुक गहाळ झाली. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन विमानतळ ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
 

नांदेड : पोलिस खात्यात असताना वादग्रस्त व सध्या निलंबीत असलेले पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रऊफ यांची परवानाधारक बंदुक गहाळ झाली. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन विमानतळ ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

परभणी नानलपेठ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर असतांना एका आरोपीचा मारहाणीत पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल असून ते सध्या खात्यातून निलंबीत आहेत. त्यानंतर परभणी येथून नांदेडच्या बी. अँड सी कॉलनीत राहण्यासाठी आपले सामान घेऊन आले.

फेब्रुवारी 2018 ते सप्टेंबर 2018 या दरम्यान ते नांदेडाला स्थाईक झाले. परंतु त्यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्या कडून स्वसंरक्षणासाठी सन 1996 मध्ये खाजगी शस्त्र बाळगण्याचा परवाना काढला होता. तो क्रमांक 12/96, 8 जूलै 1996 असा मंजूर परवाना होता. या परवान्याच्या आधारे त्यांनी सन 1997 मध्ये बारा बोर बंदूक (गन) ज्याचे वर्णन एसबीबीएल-गन न. बीएन/ 10 एफ, टेस्टेड बीएसए पलटन टस्कर कंपीनीची जिचा इंजेक्टर क्रमांक 333165 खरेदी केली होती. पंरतु सामान स्थलांतरीत करीत असतांना कुठेतरी गहाळ झाल्याचे त्यांच्या तब्बल आठ महिण्यानंतर लक्षात आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अखेर एक डिसेंबर रोजी त्यांनी विमानतळ ठाणे गाठून तक्रार दिली. यावरून पोलिसांनी बंदुक गहाळ प्रकरणी नोंद घेतली आहे. तपास फौजदार जावेद शेख हे करीत आहेत.

Web Title: PIs gun missing in nanded