नांदेडातून पिस्तुलधारी युवकाला अटक

file photo
file photo

नांदेड : विनापरवाना बेकायदेशीररित्या पीस्तुल बाळगाऱ्या विनोद फुलारे याला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी राजनगर पाटी, गणेशनगर भागात मंगळवारी (ता. तीन) दुपारी केली. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिली. श्री. चिखलीकर यांनी आपल्या पथकाला तशा सुचना दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरिक्षक पांडूरंग भारती यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालण्यास सुरुवात केली.

एपीआय श्री भारती यांची कारवाई

यावेळी श्री. भारती यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी राजनगर परिसरात सापळा लावून विनोद फुलारे यास अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक पीस्तुल जप्त केला. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून विनोद फुलारेला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विमाधारकाच्या पत्नीला आर्थीक मदत

नांदेड : येथील केंद्रीय विद्यालयातील कर्मचारी बालाजी विश्वनाथ शिंदे (शिक्षक) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर टपाल विभागाने तत्परता बाळगत त्यांच्या नातेवाईकांना आठ लाखाचा टपाल डाक जीवन विमाचा धनादेश सुपूर्त केला. 

सहशिक्षक बालाजी शिंदे यांनी आपला स्वत : चा ता. १० एप्रिल २०१९ रोजी आठ लाखाचा टपाल डाक जीवन विमा (PLI) काढला होता. त्यांनी फक्त पाच महिने रुपये दोन हजार ८४० प्रतिमहिना भरणा केला होता. परंतु ता. १४ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे वारस पूजा बालाजी शिंदे यांना नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांच्या हस्ते रुपये आठ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा धनादेश तात्काळ देण्यात आला.

डाक अधिक्षक शिवशंकर लिंगायत यांच्याकडून कौतुक

यावेळी सहाय्यक डाक अधीक्षक डॉ. भगवान नागरगोजे, सहाय्यक डाक अधीक्षक संजय आंबेकर, नांदेडचे पोस्टमास्तर डी. एम. जाधव, डाक विभागाचे विपणन आधिकारी सुरेश सिंगेवार, डाक जीवन विमा (PLI ) विभागाचे ग्यानदास आसोले, महेश गायकवाड, शेख अहेमद यांच्यासह आदी डाक कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com