शाळांची घंटा वाजणार कधी? 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.
Updated on

जालना -  नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन शिक्षण विभागाने सुरू केले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शाळा प्रवेश, वर्ग नियोजन, वाहतूक व्यवस्था यासह विविध घटकांसाठी नियम बंधनकारक राहणार आहेत, हे विशेष. सध्याची स्थिती पाहता शाळांची घंटा वाजणार कधी असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.

जगभर कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. यातच शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. राज्यभर अधिकारी यांच्या ‘झूम’ माध्यमातील बैठकांचे सत्र दररोज सुरू झाले आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात परिस्थिती निराळी असून, अनेक अडचणींना शाळांना सामोरे जावे लागत आहे.

दरवर्षी राज्यातील शाळा ता. १५ जूनदरम्यान सुरू होतात; परंतु यंदा कोरोना व्हायरस घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित विचारात घेता शाळा उशिरा सुरू कराव्यात, असे पालकांचे म्हणणे आहे. तर शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थी आरोग्याबाबत विशेष दक्षता शाळांना घ्यावी लागणार आहे.

राज्यातील शाळांची काही प्रमाणात ऑनलाइनच्या माध्यमातून अध्यापन प्रक्रिया सुरू झालेली आहे. असे असले तरी याला ग्रामीण भागात स्मार्ट मोबाईलअभावी पालकांची मानसिकता अडथळा ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. शाळा, महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थी, वसतिगृह, वाचनालय, खाणावळ याबाबत विशेष मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. 

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शाळेत विद्यार्थीसंख्येवर मोठा परिणाम होईल. ऑनलाइन शिक्षणात पालकांची मानसिकता अडसर ठरत आहे. विद्यार्थी संख्या विचारात घेता व शारीरिक अंतर नियम पाळत दक्षता घेताना शाळेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, असे वाटते. रुग्णसंख्या व प्रभाव विचारात घेता शाळांना मुदत वाढवावी, असे वाटते. 
- एस. एम. वानगोता, 
प्राचार्य, महावीर स्थानकवासी जैन विद्यालय, जालना 

शाळांना करावे लागेल असे नियोजन 

  • ऑनलाइन पर्याय उपलब्ध करावा लागेल. 
  • नियोजनात मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज ठेवावेत 
  • शिक्षक-विद्यार्थी संवाद दीड मीटरवर. 
  • विद्यार्थ्यांची गटनिहाय विभागणी. 
  • दर दोन तासांनी विद्यार्थी हात धुणे. 
  • वह्या, पुस्तकांऐवजी तंत्रज्ञानाचा अधिक वापर 
  • वीसपेक्षा जास्त विद्यार्थी एकत्रित नको. 
  • विलगीकरण कक्ष, तापमान नोंद, वैद्यकीय परीक्षण, स्वच्छता प्रशिक्षण 
  •  विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेवर दक्षता. 
  • सत्र पद्धतीने शाळांचे नियोजन. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com