प्रीतम मुंडे यांची खासदारकी धोक्यात?

सुषेन जाधव
गुरुवार, 4 जुलै 2019

निवडणूक अधिनियम १२५-अ नुसार शपथपत्रातील माहिती ही वस्तुस्थिती दर्शवणारी असावी लागते. मात्र डाॅ. प्रीतम मुंडे यांनी दिलेली माहिती चुकीची, खाेटी आणि दिशाभूल असल्याचे याचिकेत म्हटले आहे. यामुळे प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

औरंगाबाद : निवडणूक लढवताना नामांकन पत्रासाेबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत बीड लाेकसभा मतदार संघाच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

निवडणूक अधिनियम १२५-अ नुसार शपथपत्रातील माहिती ही वस्तुस्थिती दर्शवणारी असावी लागते. मात्र डाॅ. प्रीतम मुंडे यांनी दिलेली माहिती चुकीची, खाेटी आणि दिशाभूल असल्याचे याचिकेत म्हटले आहे. यामुळे प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

यासंदर्भात बीड लाेकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी ही याचिका दाखल केली आहे. संपत्ती दाखवताना सासरकडची संपत्ती दाखवली नसल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plea registered against Preetam Munde in Aurangabad bench court