esakal | आता नोव्हेंबरपर्यंत ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’चा लाभ मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

ration

आता नोव्हेंबरपर्यंत ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’चा लाभ मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत नोंव्हेबरपर्यंत मोफत गहू व तांदळाचे मोफत वाटप करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी आता स्वस्त दुकानांवर होर्डिंग्ज झळकत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या काळात अन्नधान्याचा मुबलक पुरवठा गरीब कुटुंबासाठी आधार देणारा असला तरी कठीण परिस्थितीत सरकारचे कर्तव्य असतानाही जाहिरातीचा आटापिटा कशासाठी असा प्रश्न यानिमित्त चर्चेचा विषय झाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोफत गहू व तांदळाचा लाभ केंद्र सरकारने दिला. दुसऱ्या लाटेतही मे महिन्यापासून लाभ देण्याचे सुरू झाले. जूनचे वाटप झाले. आता जुलै महिन्याचेही धान्य वाटप सुरू आहे. ऑगस्ट महिन्यातील धान्य वाटपाचे नियोजन सुरू आहे. उमरगा तालुक्यातील साधारणतः एक लाख ७९ हजार १८९ लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळत आहे. तालुक्यात अंत्योदय योजनेचे सात हजार १२८ कार्डधारकांची संख्या आहे. त्यात ३६ हजार २८२ लाभार्थी आहेत. अन्नसुरक्षा योजनेचे ३० हजार ५८५ कार्डधारक असून, त्यात एक लाख ४२ हजार ३८४ लाभार्थी आहेत. या दोन्ही योजनेत प्रत्येक लाभार्थींना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहे. दरम्यान, या योजनेतून एका महिन्यासाठी जवळपास पाच हजार ३५९.९८ क्विंटल गहू व तीन हजार ५७३.३२ क्विंटल तांदूळ लागतो.

हेही वाचा: Beed Corona Update: उतरल्यावाणी वाटलेल्या कोरोनाची दुपटीने उसळी

प्रसिद्धीसाठी दुकानदारांचा खर्च
केंद्र सरकारने प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कार्डधारकांना मोफत गहू व तांदळाचे वाटप मेपासून सुरू आहे. केंद्र सरकारने या योजनेची व्यापक प्रसिद्धी सुरू केली आहे. यासाठी दुकानदारांना प्रसिद्धीसाठी पदरमोड करावी लागली. परंतु, काही का असेना योजनेचा लाभ दिला जात असल्याने गरीब लाभधारकामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

loading image