प्रधानमंत्री मुद्रा योजनेने दिली ‘नॅचरल दिशा’

प्रधानमंत्री मुद्रा योजनेने दिली ‘नॅचरल दिशा’

हिंगोली : शहरातील महावीरनगर भागातील एका युवकाने बँकेकडून प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घेतले. मिळालेल्या कर्जातून लाकडी तेल घाणा विकत घेतला. आता शुद्ध खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. यासाठी ‘सकाळ’ ‘एसएलआयसी’मध्ये प्रशिक्षणही घेतले आहे.

हिंगोली येथील महावीरनगर येथील युवक आशीष साळवे यांनी पुणे येथे ‘सकाळ’ ‘एसएलआयसी’मध्ये अॅग्री बिझनेसचे प्रशिक्षण घेतले. त्‍यांनतर त्‍यांनी लाकडी तेलघाणा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी त्‍यानी एसबीआय बँकेकडून मुद्रा लोण घेतले. मिळालेल्या या कर्जामधून त्‍यांनी कोईमतूर (तामीळनाडू) येथून खाद्यतेलाचे उत्पादन करणारा विजेवर चालणारा लाकडी घाणा खरेदी केला.
हेही वाचा-Video : साई जन्मसंस्थानमध्ये महाआरती


दिशा नॅचरल तेलघाणा

शहरात ‘दिशा नॅचरल तेलघाणा’ या नावाने हा उद्योग सुरू केला. यातून शुद्ध गोडेतेल काढत आहे. अडीच किलो शेंगदाण्यातून एक लिटर शुद्ध खाद्यतेल निघत असून त्याची पॅकिंग करून ते २५० रुपये लिटरप्रमाणे विकले जात आहे. लाकडी घाण्यातील मिळणारे शुद्ध खाद्यतेल शहरात उपलब्ध झाल्याने त्‍याची नागरिकांतून खरेदी केली जात आहे. यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

लाकडी घाणा टाकण्याचा निर्णय

आज घडीला बाजारात शुद्ध तेलाच्या नावाने भेसळयुक्त तेलाची विक्री केली जात आहे. पैसे जास्त मोजूनही शुद्ध तेल मिळत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. याचा परिणाम जीवनशैलीवर होत आहे. विविध आजार बळावत चालले आहेत. हिंगोलीतील नागरिकांना शुद्ध तेल मिळावे, तसेच रोजगारही उपलब्ध व्हावा, यासाठी आशीष साळवे यांनी शुद्ध खाद्यतेल उत्पादन करण्याचा लाकडी घाणा टाकण्याचा निर्णय घेतला.

रोजगार उपलब्ध

आता हिंगोलीकरांना शुद्ध तेल मिळत असून आशीष यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आशीष साळवे हे वृक्षप्रेमी असून शहरात अण्णा जगताप यांनी सुरू केलेल्या दर रविवारी ‘एक घंटा वृक्षासाठी’ या उपक्रमात सहभागी होतात. त्‍यामुळेच मानवी जीवनाला अपायकारक ठरणार नाही असा उत्पादननिर्मितीचा व्यवसाय निवडल्याचे त्यांनी सांगितले.


व्यवसायाची निवड                                                        अनेक दिवसांपासून लाकडी तेल घाणा सुरू करण्याचा विचार मनात आला. त्‍यासाठी लागणारे भांडवल उपलब्ध करण्याचा प्रश्न पुढे आला. मात्र, यासाठी सतत प्रयत्‍नशील राहत ‘सकाळ’तर्फे सुरू असलेल्या ‘एसएलआयसी’ या पुणे येथील केंद्रात प्रशिक्षण घेतले. या व्यवसायाची निवड करून बँकेकडून मुद्रा लोण घेतले. यातून शुद्ध तेल उत्पादन निर्मितीचा घाणा सुरू केला आहे.
-आशीष साळवे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com