'भारत नावाच्या ताजमहलाला भगवा बनवणाऱ्यांना ओळखा'

सुशांत सांगवे
शनिवार, 13 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदोरी लातुरात आले होते. एनएसयुआयच्या वतीने आयोजित प्रचार संमेलनात त्यांनी मतदारांशी संवाद साधला. मला कोणावरही नाव देऊन टीका करायची नाही, असे सांगतच त्यांनी भाषणाला सुरवात केली. 'सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है', 'नजर रखना जरा तुम अपने चौकीदार पर, वरना सफाई के नाम पर सारे हिंदुस्थान को साफ कर देगा' अशा त्यांच्या वेगवेगळ्या रचनांना टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांनी दाद दिली.

लातूर : भारत नावाच्या मजबूत इमारतीला ज्यांना धक्का द्यायचा आहे, भारत नावाच्या मजबूत ताजमहलाला ज्यांना भगवा बनवायचा आहे, अशांपासून तुम्ही दूर रहा. अशा लोकांमुळेच तर मुल्क अडचणीत सापडला आहे. भीतीत अडकला आहे. अशा लोकांना ओळखा आणि अंधाराऐवजी प्रकाशाला, खोटेपणाऐवजी खरेपणाला साथ द्या, असे आवाहन ख्यातनाम कवी-गीतकार राहत इंदोरी यांनी येथे केले. सरहदोंपर बहुत तणाव हैं क्या?, कुछ पता तो करो कहीं चुनाव हैं क्या, हा गाजलेला शेरही त्यांनी या वेळी सादर केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदोरी लातुरात आले होते. एनएसयुआयच्या वतीने आयोजित प्रचार संमेलनात त्यांनी मतदारांशी संवाद साधला. मला कोणावरही नाव देऊन टीका करायची नाही, असे सांगतच त्यांनी भाषणाला सुरवात केली. 'सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है', 'नजर रखना जरा तुम अपने चौकीदार पर, वरना सफाई के नाम पर सारे हिंदुस्थान को साफ कर देगा' अशा त्यांच्या वेगवेगळ्या रचनांना टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांनी दाद दिली.

मला राजकीय मंचावर पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असणार. 'राहत इंदोरी इथे काय करताहेत', असा प्रश्नही त्यांच्या मनात पडला असेल. कारण राजकारण आणि खरेपणा यात छत्तीसचा आकडा असतो. जेथे राजकारण असते तेथे खरेपणा नसतो आणि जेथे खरेपणा असतो तेथून राजकारण दूर पळालेले असते. मी तर आयुष्यभर खरेपणा शोधत, जपत, लिहीत आणि जगत आलो आहे. त्यामुळेच तर अनेकांना मी राजकीय मंचावर जावू नये, असेच वाटत होते. मला अनेकांनी रोखलेसुद्धा. तरीही मी राजकीय मंचावर आलो आहे. कारण मी खरेपणापासून दूर पळालेलो नाही, असे इंदोरी यांनी सांगितले.

एक चिमणी जंगलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असते, ही कथा सांगत मीही सध्या तोच प्रयत्न करतोय. पुढे जेव्हा केंव्हा निवडणुकीचा विषय निघेल तेव्हा माझे नाव आग विझवणाऱ्यांमध्ये घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. आगामी निवडणूक ही एका अर्थाने युद्धच आहे, असे सांगत त्यांनी, जा के कोई कह दे, शोलों से-चिंगारी सें, फुल इस बार खिले है बडी तयारी से, मुद्दतो बाद युँ तक्दिल हुआ हैं मौसम, जैसे छुटकारा मिला हो किसी बिमारी सें, ही रचना सादर करत मैफलीची सांगता केली.

Web Title: poet Rahat Indori criticize government policies