खव्याच्या पदार्थातून सहाजणांना विषबाधा, बीडमध्ये एकाच कुटुंबात प्रकार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

शहरातील मोमिनपुरा भागातील इमरान खान गौसा खान यांनी पांगरी रोडवरील ओम खवा व पेढा सेंटर या दुकानातून खवा खरेदी केला. या खव्याचे पदार्थ बनवून खलल्यानंतर गौसा खान गुलाब खान, जाकेर गौसा खान, सालेहा पठाण, सिद्धीखाँ पठाण, अरसलान पठाण, सिजा पठाण यांना उलटी, मळमळ, जुलाब असा त्रास होऊ लागला.

बीड - खव्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील सहाजणांना अचानक उलटी, जुलाब, होऊ लागले. मंगळवारी (ता. १६) या प्रकारानंतर सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

शहरातील मोमिनपुरा भागातील इमरान खान गौसा खान यांनी पांगरी रोडवरील ओम खवा व पेढा सेंटर या दुकानातून खवा खरेदी केला. या खव्याचे पदार्थ बनवून खलल्यानंतर गौसा खान गुलाब खान, जाकेर गौसा खान, सालेहा पठाण, सिद्धीखाँ पठाण, अरसलान पठाण, सिजा पठाण यांना उलटी, मळमळ, जुलाब असा त्रास होऊ लागला. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने शहरातील तेलगाव नाका परिसरात असलेल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती 

या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न व औषधी अधिकारी अनिकेत भिसे, एस. आर. मरेवार यांनी संबंधित दुकानातून खव्याचे नमुने ताब्यात घेतले असून, ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदरील दुकान अन्न व औषधी विभागाने पोलिसांच्या मदतीने सील केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poisoning of six members of the same family in Beed