पिंपळगाव रेणुकाईत लाडक्‍या सर्जा-राजाची खांदेमळणी 

प्रकाश ढमाले
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) - परिसरात यंदा पावसाळ्याच्या प्रारंभी पावसाने चांगली हजेरी लावल्याने परिसरात नदीनाले, खदानीत मुबलक पाणी आहे. त्यामुळे यंदा पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदेमळणीसाठी ठिकठिकाणी सर्जा-राजाच्या जोडीसह शेतकरी, युवकांनी गर्दी केलेली गुरुवारी (ता. 29) दिसून आली. 

शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण मानला जाणारा पोळा यंदा दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर पडलेला आहे. गतवर्षी पोळा सणावर पूर्णपणे दुष्काळाचे सावट होते. यंदा हे चित्र बदलले.

भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात सुरवातीपासूनच पावसाने कृपादृष्टी ठेवली. त्यामुळे खदान, मातीबांध, बंधारा, नदी, नाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले. परिणामी पोळ्यानिमित्त खांदेमळणीचा उत्साह यंदा चांगला होता. 

अर्थात सध्या पिके जोमात असली तरी पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात घट होण्याची भीतीही व्यक्‍त होत आहे. अशा स्थितीत पाऊस पडावा, अशी अपेक्षाही व्यक्‍त होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pola festival