Jalna Accident: कर्तव्यावर जाताना पोलिसाचा अपघातात मृत्यू; अन्य दोघे जखमी, जालना-अंबड रोडवरील घटना
Ambad Road Accident: कर्तव्यावर जात असताना जालना–अंबड रोडवर झालेल्या भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटून शेतात जाऊन उलटले, यात अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
अंबड (जि. जालना) : जालन्याहून अंबडमार्गे घनसावंगी येथे कर्तव्यावर जात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास जालना-अंबड रोडवरील मठपिंपळगाव शिवारात घडली.