Beed : पोलिस दल अलर्ट; ‘आयजीं’चा मुक्काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

पोलिस दल अलर्ट; ‘आयजीं’चा मुक्काम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना चार दिवस जिल्हा मुक्कामी येणार असल्याने बीड पोलिस दल अलर्ट झाले आहे. सोमवार (ता. १५) पासून मल्लिकार्जुन प्रसन्ना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सोमवार ते शुक्रवार (ता. १९) पर्यंत पोलिस दलाची वार्षिक तपासणी होणार आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्याकडून होणाऱ्या वार्षिक निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिस दलात १५ दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी नियमित ठाणेप्रमुख, विविध शाखांच्या प्रमुखांचा आढावा घेत आहेत. तक्रार अर्ज, दाखल गुन्हे, तपासाची स्थिती यांसह विविध अभिलेख्यांची मल्लिकार्जुन प्रसन्ना तपासणी करणार आहेत. सोबतच कामकाजासंदर्भात दिलेली उद्दिष्टे, मागील तपासणीवेळी आढळलेल्या त्रुटींची पूर्तता झाली किंवा नाही, या बाबीही ते पडताळणार आहेत. महिला अत्याचाराचे गुन्हे, दरोडे, ॲट्रॉसिटी, जातीय दंगली, बाललैंगिक अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यांचा ते स्वतंत्र आढावा घेणार आहेत. पोलिस ठाण्यांनाही भेटी देण्यात येणार आहेत. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या तपासणी दौरा व मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट आहे.

loading image
go to top