
कर्तव्यासोबतच पोलिसही रमले संमेलनात
उदगीर, (जि. लातूर) - ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार होते, मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला, या दौऱ्यानिमित्त दाखल झालेला पोलिसांचा फौजफाटा तसाच तैनात करण्यात आला होता. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरवात झाली असता, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीही ग्रंथदिंडीत सामील होत सेल्फी काढल्या. विशेष म्हणजे यामध्ये महिला पोलिसांचा प्रामुख्याने सहभाग दिसून आला.
एकमेव ठिकाण
३२ वर्षे पोलिस दलात सेवेत असलेले धनंजय कुलकर्णी म्हणाले की, मी प्रथमच साहित्य संमेलनात सहभागी झालो आहे. संमेलनातील पोलिस ड्युटी म्हणजे हे एकमेव असे ठिकाण आहे, की येथे बळाचा वापर करावा लागत नाही. साहित्याची भूक भागविण्यासाठी आलेले सर्व रसिक यांच्यातही शिस्तीचे दर्शन पहावयास मिळते. आजवर अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी गेलो, मात्र संमेलनात बंदोबस्तसाठी ड्युटी लागणे हा एक अनुभव म्हणून खूपच चांगला आहे.
Web Title: Police Also Participant In The Symposium
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..