खंजरचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणारा वैरागी पोलिसांच्या जाळ्यात

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

खंजरचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणाऱ्या वैराग्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंगावर भगवी वस्त्र, डोक्यावर केसाच्या जटा, एका हातात कमंडलु तर दुसऱ्या हातात खंजर रविवार (ता.3) वेळ सकाळची अकरा वाजता चंदासिंग कॉर्नर येथे चक्क हा वैरागी खंजरचा धाक दाखवत वाहनधारकांना थांबवून पैशाची मागणी करीत होता.नांदेड ग्रामिण पोलसांनी लगेच दखल घेऊन त्याला अटक केली आहे. तो बळीरामपूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नांदेड - खंजरचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटणाऱ्या वैराग्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंगावर भगवी वस्त्र, डोक्यावर केसाच्या जटा, एका हातात कमंडलु तर दुसऱ्या हातात खंजर रविवार (ता.3) वेळ सकाळची अकरा वाजता चंदासिंग कॉर्नर येथे चक्क हा वैरागी खंजरचा धाक दाखवत वाहनधारकांना थांबवून पैशाची मागणी करीत होता.नांदेड ग्रामिण पोलसांनी लगेच दखल घेऊन त्याला अटक केली आहे. तो बळीरामपूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शहरातील चंदासिंग कॉर्नर हा भाग अतिशय वाहतुकीचा व प्रवाशांचा थांबा असलेला परिसर आहे. या भागात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास बळीरामपूर येथील वैरागी असलेला सुरेश लक्ष्मण वैरागी (वय ३८) हा साधुच्या वेशात आला आणि तो येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या समोर जाऊन थांबवून खंजर दाखवत पैशाची मागणी करीत होता. वाहनातील महिला, लहान मुल व सर्वचजण भयभीत होत. हा प्रकार काही सुज्ञ नागरिकांनी चित्रीत करून पोलिस अधिक्षक यांच्या व्हाटस्अप ग्रुपवर टाकला. तसेच अन्य ग्रुपवर तो व्हायरल झाला. यानंतर ग्रामिण पोलिस ठाण्याचे फौजदार गजानन मोरे यांनी तेथे येऊन कारवाई केली. त्यानंतर त्याला ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

Web Title: police arrested one in nanded