गोव्याची दारू आणून गावात विकली खरी, पण...  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

अवैधरीत्या गोव्याची दारू आणून त्याची विक्री करणाऱ्यावर देवताळा (ता. औसा) येथे शनिवारी (ता.२९) रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने छापे टाकले.

लातूर : अवैधरीत्या गोव्याची दारू आणून त्याची विक्री करणाऱ्यावर देवताळा (ता. औसा) येथे शनिवारी (ता.२९) रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने छापे टाकले.

यात विदेशी, देशीदारू व एक कार असा एकूण पाच लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे. तर दोन महिला मात्र फरार झाल्या आहेत.

गोवा येथून अवैधरीत्या दारू आणून त्याची देवताळा येथे विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांना मिळाली. यात काही महिला असल्याचेही त्यांना समजले.

पुन्हा एका बालिकेवर अत्याचार.. वाचा कुठे

त्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांच्याशी संपर्क साधून महिला पोलिस कर्मचारी देण्याची विनंती केली. त्यांना एक महिला कर्मचारी व दोन पोलिस हवालदार देण्यात आले.

दोन महिला मात्र फरार

दरम्यान शहर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे हे जिल्ह्याची गस्त घालत असताना औसा तालुक्यातच होते. त्यांचीही मदत घेण्यात आली. या सर्वांनी रात्री देवताळा येथे छापा टाकला. यात पोलिसांनी उत्तम पुनाराम चव्हाण, अनिल हरिदास राठोड, तानाजी दगडू सूर्यवंशी या तीघांना अटक केली तर बालिका उत्तम चव्हाण व रूक्‍मीणबाई परशुराम राठोड या दोन महिला मात्र फरार झाल्या.

उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

या छाप्यात पोलिसांनी गोवा राज्यातून अवैधरीत्या आणलेली ५२ हजार ८९६ रुपयांची १६४ लिटर विदेशी दारू जप्त केली. तसेच आठ हजार ८४० रुपयांची बनावट ३१ लिटर देशी दारू व एक कार असा एकूण पाच लाख ४१ हजार ७३६ रुपयांचा माल जप्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Three In Ausa Latur News