दानवेंच्या घरासमोर उपोषण करणाऱ्या तरुणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

अटक झाली तरी उपोषण सुरुच

रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर उपोषणाला बसलेल्या तरुणांना पोलीसांनी अटक केल्यानंतरही हे तरुण उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे त्यांच्याकडुन सांगण्यात येत आहे.

जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकरी पुत्रांना काल रात्री उशीरा पोलिसांनी ताब्यात घेतले. तूर खरेदीप्रश्‍नी शेतकऱ्यांप्रति अनुद्‌गार काढणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी, पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानासमोर काही तरुणांनी शुक्रवारी (ता.12) सकाळपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज(शनिवार) जालना व उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा असल्याने या तरुणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या या कृतीनंतर सोशल मीडियातून याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

अटक झाली तरी उपोषण सुरुच

रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर उपोषणाला बसलेल्या तरुणांना पोलीसांनी अटक केल्यानंतरही हे तरुण उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे त्यांच्याकडुन सांगण्यात येत आहे.

Web Title: police arrested youth protesting in bhokardan