नांदेड : पोलिस बँड पथकाने केले मंत्रमुग्ध 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

‘राष्ट्रीय एकता दिनाचे' औचीत्य साधून प्रभारी पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने बुधवारी जूना मोंढा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देऊन बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत वाजविण्यात आले. तसेच दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रीय संकल्प दिन' साजरा करण्यात आला.

नांदेड : सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि दिवंगत इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त बुधवारी (ता. ३१) पोलिस दलाच्या वतीने एकता दौड काढून राष्ट्रीय एकता दिन साजरा केला. यावेळी पोलिस बँड पथकांद्वारे शहरातील मुख्य चौकात देशभक्तीपर धून वाजवून नांदेडकरांना मंत्रमुग्ध केले. 

‘राष्ट्रीय एकता दिनाचे' औचीत्य साधून प्रभारी पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने बुधवारी जूना मोंढा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देऊन बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत वाजविण्यात आले. तसेच दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रीय संकल्प दिन' साजरा करण्यात आला.

यानंतर शहरातील महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वजिराबाद चौक, तरोडा नाका, वर्कशॉप कॉर्नर, बर्की चौक, देगलूर नाका, बाफना टी पॉईन्ट यासह आदी मुख्य चौकात पोलिस बँड पथकाची धून नांदेडकरांना एेकावयास मिळाली. शहरातून पोलिस दलाच्यावतीने एकता दौड काढण्यात आली. यावेळी पोलिस उपाधिक्षक (गृह) ए. जी. खान, इतवाराचे धनंजय पाटील, शहरचे डीवायएसपी अभिजीत फस्के, परिविक्षाधीन डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांनी सरदार पटेल आणि दिवंगत इंदिरा गांधी यांना अभिवादन केले. दौड रॅलीत पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, अनिरूध्द काकडे, श्री. गुट्टे, शहादेव पोकळे, सपोनी राजेंद्र मुंडे, जनसंपर्क अधिकारी अशोक लाटकर यांच्यासह अधिकारी आणि एक हजार पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिस बँडची धून एेकण्यासाठी चौका- चौकात नांदेडकरांनी गर्दी केली होती. 

Web Title: police band performance in Nanded