बीडमध्ये ठाण्यात जाऊन पोलिसाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

बीड - ‘मुलाला पोलिस ठाण्यात का आणले,’ या कारणावरून एकाने पोलिस कर्मचाऱ्याला ठाण्यात येऊन शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. २२) रात्री शिवाजीनगर ठाण्यात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सुधीर शिंदे (रा. केसापुरी परभणी, ता. बीड) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. 

पोलिसांच्या चार्ली पथकातील सचिन पवार यांनी सुधीरच्या मुलाला मित्रनगर भागात पकडून पोलिस ठाण्यात आणले होते. नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाने सचिन पवार यांच्यासोबत अरेरावी केली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. येथे त्याचे वय कमी असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याऐवजी नातेवाइकांना बोलावून घेत समज देण्यात आली. ही माहिती सुधीर शिंदे यालाही दिली होती. त्याने आपण बीडला आल्यावर हे प्रकरण पाहून घेऊ, असे पोलिसांना सांगितले होते.

मंगळवारी शिवाजीनगर ठाणे हद्दीत सचिन पवार आणि खंडागळे हे दोघे गस्त घालत होते. रात्री आठला सचिन पवार यांना सुधीर शिंदेचा फोन आला. त्याने पवार यांना शिवीगाळ केली. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझ्या मुलाने काहीही केले तरी तुला काय करायचे, असे म्हणत अरेरावी केली. पवार यांनी त्याला ठाण्यात बोलावले. रात्री बाराला पवार ठाण्यात येताच, ‘तूच का पवार,’ असे म्हणत त्यांची कॉलर पकडली आणि मारहाण करण्यास सुरवात केली. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून सोडवासोडव केली. त्यानंतर सुधीर शिंदे याला शहर पोलिस ठाण्यात हजर करून शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. सध्या तो शहर पोलिसांच्या ताब्यात आहे.

Web Title: police beating in the police station in beed