आले अनोखे आंदोलन करायला अन् पोलिसांनी घेतले ताब्यात 

andolan
andolan

हिंगोली ः शहरात पालिकेकडून १०१ कोटी निधीतून होत असलेली रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची होत आहेत. शिवाय जुन्या रस्त्यांचे अंदाजपत्रकानुसार खोदकाम न करताच नवीन रस्त्यांची कामे सुरू करून यात भ्रष्टाचार केला जात आहे. या बाबत अनेक वेळा कारवाई करण्यासाठी निवेदन दिले, मात्र संबंधितांवर कारवाई होत नसल्याने सोमवारी (ता. २०) प्रशासनाच्या विरोधात शवयात्रा काढण्यापूर्वीच विराट लोकमंचच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हिंगोली पालिकेच्या वतीने शहरात नगरोत्‍थान योजनेंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी बेंच मार्क न करताच अनेक प्रभागात कामे सुरू केली आहेत. तर काही ठिकाणी संथ गतीने कामे सुरू असल्याने अद्यापही अपूर्ण आहेत. प्रत्येक तीन घरांसोर एक आऊटलेट चेंबर असणे गरजेचे असताना मात्र, अनेक ठिकाणी चेंबरची उभारणी न करताच २०१९ च्या विधानसभेची संधी साधून पालिकेचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी शासन निर्णय पायदळी तुडवत आर्थिक व्यवहाराच्या जोरावर १०१ कोटी निधींपैकी ५७ रस्त्याचे कामे सुरू करण्याचे वर्क आदेश एकाच कंपनीला दिली आहे. त्यानुसार ९० कोटी २१ लाख ६३ हजार रुपयांचा धनादेशही दिला असल्याचा आरोप केला आहे.

विभागीय आयुक्त, संबंधित मंत्र्यांनादेखील निवेदन
शहरातील जुन्या रस्त्यांचे खोदकाम न करताच त्या ठिकाणी मुख्याधिकारी, कंत्राटदार, पदाधिकारी यांच्या संगनमताने अंदाजपत्रकाप्रमाणे खोदकाम न करताच नवीन रस्त्यांची कामे सुरू करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. याप्रकरणी विराट लोकमंचने सातत्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना या कामांची चौकशी केली जात नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त, संबंधित मंत्र्यांनादेखील निवेदन दिले आहे. 

दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका
अद्यापही कारवाई होत नसल्याने सोमवारी (ता.२०) शासन, जिल्हा प्रशाशन, नगरपालिका प्रशासन यांच्या विरोधात फलटण येथून शवयात्रा काढली जात असताना पोलिसांच्या सतर्कतेने शवयात्रा काढण्यापूर्वीच विराट लोकमंच संघटनेच्या दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर काही वेळाने सुटका केली. त्यानंतर विराट संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

आंदोलन चिरडल्याने निवेदन
नगरपालिकेतील भूमिगत गटार योजनेची होत असलेली बोगस कामे व निकृष्ठ दर्जाची कामे यातून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान, रस्त्याच्या कामात होत असलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या प्रकरणी शासन, जिल्हा प्रशासन, नगरपालिका यांच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या शवयात्रा व प्रशासनाला देण्यात येणारा बांगड्यांचा आहेर आंदोलनाला पोलिसांकडून चिरडल्याने औपचरिकता म्हणून निवेदन द्यावे लागले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com