कोणते गुन्हे घडले आज हिंगोली जिल्ह्यात वाचा...

download
download
Updated on

हिंगोली ः कुठे अल्पवयीन मुलीची छेड तर कुठे कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा अशा विविध घटना हिंगोली जिल्ह्यात रविवारी रात्री ते सोमवार सायंकाळपर्यंत घडल्या आहेत. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करीत पोलिसांनी कारवाई केली आहे.   


कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा २६ महिला ताब्यात
हट्टा ः वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा बाजार येथे सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी रविवारी (ता.१९) छापा टाकून २६ महिलांना ताब्यात घेतले. यातील सहा महिला आणि एका पुरुषावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जवळा बाजार येथे गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असून त्याठिकाणी पीडित महिला आणि काही युवतींना देह विक्रीस प्रवृत्त केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश देशमुख यांनी वसमत ग्रामीण आणि शहर पोलिस ठाण्याचे पथक तयार केले. यात वसमत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पंढरीनाथ बोधनापोड, लेकुळे यांनी जवळा बाजार येथील कुंटणखाण्यावर छापा टाकला. यामध्ये सहा महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले असून त्‍यांच्या विरोधात हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

अवैध गौण खनिजप्रकरणी एकावर गुन्हा
आखाडा बाळापूर ः कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा बाळापूर येथील शेवाळारोड भागात बाराशे रुपये किमतीचे गौण खनिज चोरून नेत असताना ऑटोसह एकावर सोमवारी (ता.२०) बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बाळापूर येथील शेवाळारोड भागातील जनावरांच्या दवाखान्यासमोर रविवारी (ता.१९) रात्रीच्या सुमारास ऑटो (क्रमांक एमएच २६ - टी ६००१) मध्ये पिंपरी येगाव ते शेवाळा रोड येथे बाराशे रुपये किमतीचे गौण खनिज विनापरवाना नेत असताना डोंगरगाव सज्‍जाचे तलाठी बालासाहेब मोरे यांच्या फिर्यादीवरून दलित रणवीर (रा. पिंपरी, येगाव) यांच्याविरुद्ध बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस करीत आहेत. 

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोघांना अटक
वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा पांचाळ येथे अल्‍पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोन युवकांना रविवारी (ता.१९) अटक करण्यात आली आहे. जवळा पांचाळ येथील अकरावीत शिकणारी तरुणी खासगी शिकवणीकरिता अर्धापूर येथे ये-जा करते. गावातील दोन तरुणांनी तिच्यावर पाळत ठेवून गावातील ऑटो पॉईंटवर थांबून तिचा व्हिडीओ बनविला व सोशल मीडियावर प्रसारित केला. ही घटना येथील टी पॉईंटवर ता. एक डिसेंबर ते १८ जानेवारीपर्यंत घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गावातील आमीरखान अब्दुल गफारखान व आरिफखान करीमखान पठाण (दोघे रा. जवळा पांचाळ) यांच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक विकास थोरात हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Dramatic Chase in Chhatrapati Sambhajinagar Ends with Safe Rescue of Minor Girl
Marathi News Esakal
www.esakal.com