रक्षणकर्तेच लाचेच्या जाळ्यात!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

हरवलेल्या मुलीचा शोध लावून दिल्याबद्दल एक हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलिस नाईक रामेश्वर गिरी याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

नांदेड : हरवलेल्या मुलीचा शोध लावून दिल्याबद्दल एक हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलिस नाईक रामेश्वर गिरी याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तक्रारदाराची मुलगी हरवली होती. या प्रकरणाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक रामेश्वर गिरी यांनी करून हरवलेल्या मुलीचा शोध लावला. मुलीचा शोध लावण्यासाठी कागदपत्रांसाठी व वर्तमानपत्रात प्रसिद्धीसाठी एक हजार रुपये लागले आहेत ते द्या, अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात निष्पन्न झाली. पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गोडबोले यांनी मागणी पडताळणी सापळा रचला होता. मागणी सिद्ध झाल्याने पोलिस नाईक रामेश्वर गिरी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police caught while taking bribe at Nanded