कंत्राटदारास 11 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

तुळजापूर - नगरपालिकेच्या यात्रा अनुदान अपहारप्रकरणी अटक केलेल्या शशिकांत ईश्वर जाधव यास अकरा एप्रिलपर्यंत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. सहा) पोलिस कोठडी सुनावली.

तुळजापूर - नगरपालिकेच्या यात्रा अनुदान अपहारप्रकरणी अटक केलेल्या शशिकांत ईश्वर जाधव यास अकरा एप्रिलपर्यंत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. सहा) पोलिस कोठडी सुनावली.

तुळजाभवानी मातेच्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या एक कोटी 62 लाख रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद राजाभाऊ माने यांनी दिली आहे. या फिर्यादीनुसार तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, नगराध्यक्ष अर्चना गंगणे, लेखापाल अविनाश राऊत यांच्यासह 28 जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणातील कंत्राटदार शशिकांत जाधव यास पोलिसांनी बुधवारी (ता. पाच) अटक केली. तपास अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी न्यायालयास ठेकेदार श्री. जाधव यांची कागदपत्रे तपासणे, त्यास दिलेली बिले तपासणे, अन्य आरोपींच्या माहितीसह विविध बाबींसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली. न्यायालयाने शशिकांत जाधव याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तुळजापूर नगरपालिकेतील यात्रा अनुदान प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरारी आहेत.

Web Title: police custody to contractor