महिला, मुलींसाठी पोलिस क्षेत्र एक 'फॅन्टास्टिक जॉब' : पाटील

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 19 जून 2019

- महिला, मुलींसाठी पोलिस क्षेत्र एक 'फॅन्टास्टिक जॉब'

औरंगाबाद : "प्रत्येक क्षेत्र रिस्क असते पोलिस क्षेत्र महिलांसाठी अजिबात रिस्क नाही. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा त्यांच्या भल्यासाठी काम करते, पोलिस क्षेत्र महिलाबरोबर पुरुषासांठी एक फॅन्टास्टिक जॉब आहे. या क्षेत्रात महिलांनी यावेत. कारण एखाद्या प्रश्‍नाला तोंड देताना ती परिस्थिती हातळण्याची क्षमताही महिलांमध्ये योग्यप्रकारे असते, असे मत पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केले.

'डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) यिन समर यूथ समिटला बुधवारी (ता.19) प्रारंभ झाला. अमरप्रीत चौक येथील पाटीदार भवन येथे सकाळी 11 वाजता पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, माजी सनदी अधिकारी कृष्णा भोगे, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील, यिनचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराती यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवात पहिल्या दिवशी मान्यवरांनी विविध विषयावर मागर्दशन केले. 

स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी (नाशिक),बारामती ऍग्रो लिमिटेड यांच्या सहयोगाने "जेएसपीएम' पॉवर्डबाय असणाऱ्या या सिमेट मध्ये उद्‌घाटन सत्रानंतर पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी तरुणाईशी प्रश्‍न उत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. 
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय करायला पाहिजेत. यात येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

मोक्षदा पाटील म्हणाल्या, स्पर्धा परीक्षा ही स्वत:शी असते. यामुळे आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात लक्ष द्यावेत. परीक्षेत अपयश आले तर रांग, संपात येणे सहाजिक आहे. त्यानंतर आपण कुठे कमी पडलो, याचे ऍनालिसेस करावेत. स्पर्धा परीक्षा ही जंगलासारखी असते. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना कंम्फट झोनमधून बाहेर पडत काम करावे लागते.

चूल आणि मूल या प्रकरणातून महिला बाहेर पडल्या तरी पुरुष अद्यापही त्याच मानसिकतेत बाहेर येत खुल्या मनाने विचार करावा. असा सल्ला देत पोलिस क्षेत्रात जास्तीत जास्त तरुणाईने येण्याचे आवाहन केले. 

या समिटचे असोसिएट्‌स स्पॉन्सर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पुणे), नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ (पुणे), सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स (पुणे), सृजन कॉलेज ऑफ डिझाईन (पुणे), रांका ज्वेलर्स (पुणे) आहेत. दीपस्तंभ फाउंडेशन, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक सहप्रायोजक आहेत. 

स्वत:चा शोध घ्या : भाग्यश्री जाधव 

स्पर्धा परीक्षेस ग्लॅमरस स्वरुप प्राप्त झाले आहे. यात येणाऱ्या प्रत्येकांना आपण इतराप्रमाणे या क्षेत्रात आलो की, आपल्या या क्षेत्रात खरंच करिअर करायचं आहे. हे ठरवलं पाहिजे. पहिले स्वत:चा शोध घ्यावे. त्यानंतर या क्षेत्राकडे वळावेत. प्रशासकीय क्षेत्रात अधिकाऱ्यास येणार प्रत्येक दिवस हा आव्हानात्मक असतो. वाचन,लेखन, आणि चिंतन या गोष्टी महत्वाच्या आहे. स्पर्धा परीक्षेत मुलाखत हा भाग महत्वाचा असतो. यश हे आपोआप मिळत नाही.त्यासाठी मेहनतच करावी लागते, असे जालना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले. 

यिनच्या माध्यमातून सामाजिक नेतृत्व उभे राहावे : भोगे 

देशातील 70 टक्‍के लोक ग्रामीण भागात राहतात. 73 वर्षे झाली तरीही या भागाचा राज्यकर्ते आणि सिस्टीम राबविणाऱ्यांमुळेच अद्यापही विकास झालेला नाही. यामुळे आता सामाजिक नेतृत्वाची गरज आहे. यिन फोरम हे नेतृत्व उभे करेल असा विश्‍वास माजी सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी व्यक्‍त केला. 

भोगे म्हणाले, आज प्रत्येकजण स्पर्धा परीक्षेच्या मागे लागला आहे. मालक असतानाही प्रत्येकजण नोकर बनू पाहात आहे. शेतकऱ्यांची मुले असताना त्यांना शेतकरी व्हावसं वाटत नाही. प्रत्येकांने नोकरी केली तर शेती कोण करणार. अन्य-धान्य कोण पिकवणार, यामूळे देशाचा जीडीपी कुठे जाणार. स्पर्धा परीक्षा प्रमाणे पोपटराव पवार का होऊ वाटत नाही. आपल्या गावासाठी काम का करावं वाटत नाही.

73 वर्षांत राजकीय व्यवस्थेने देशाचे सत्यानाश केला. याला राज्यकर्ते आणि सिस्टीम जबाबदार आहे. यामुळे आता निस्वार्थ सेवा देणारे सामाजिक नेतृत्व उभे राहण्याची गरज आहे. यिनच्या माध्यमातून हे नेतृत्व उभे राहील. यासाठीच हे फोरम काम असल्याचे मला वाटते, असेही भोगे म्हणाले.

तुम्ही तुमच्या भागाचे नेतृत्व करा, सरकारी योजना कशाप्रकारे राबविल्या जातात. त्यावर लक्ष ठेवा, असे अवाहन भोगे यांनी तरुणाईला केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Department is Fantastic Job For Girls and Women says SP Patil