पोलिसांनी चारशे लिटर दारू केली नष्ट; सहा महिलांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मरखेल (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील सीमावर्ती भागातील अवैध धंद्यासह अवैध दारूविक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षकांनी सूचना दिल्या. या सुचनेनंतर मरखेल पोलिसांनी तातडीची पावले उचलत अवैध गावठी रसायनमिश्रित दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्या सहा महिलांवर कारवाई केली. त्यांच्याजवळील सुमारे 22 हजार 750 रुपयांची दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. ही कार्यवाही 'थर्टीफर्स्ट'च्या सकाळी सहाच्यादरम्यान केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, येथून जवळच असलेल्या लोणी तांडा (ता.देगलूर) येथे अवैध गावठी दारूची निर्मिती व विक्री केली जात आहे. अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिनेश येवले, जमादार मोहन कनकवळे, प्रभाकर कदम, अंगद कदम, प्रभाकर गुडमलवार, पुरी, पोलिस शिपाई तातेराव केंद्रे, संभाजी पाटील, विष्णू चामलवाड, रवी भुले, रविशंकर बामणे, महिला शिपाई सीमा टिमके, एम.बी.शेख, कल्पना पावडे यांच्या पथकाने लोणी तांडा येथील लक्ष्मीबाई रामराव पवार, दयाबाई पंढरी जाधव, देवूबाई किशन जाधव, सखुबाई जालिंधर राठोड, लक्ष्मीबाई राजाराम पवार, कंबळबाई शंकर जाधव आदी महिलांच्या घर व त्यांच्या जागेची तपासणी करून, विक्रीसाठी गाळप करीत असलेल्या सुमारे 22 हजार 750 रुपये किमतीची चारशे पाच लिटर गावठी रासायनमिश्रित दारू जप्त केली आहे. उपरोक्त दारू व अन्य साहित्य सदरील जायमोक्यावर नष्ट करण्यात आले आहे.

उपरोक्त सहा दारूविक्रेत्या महिलांवर मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश कुंभारे हे करीत आहेत.

Web Title: Police Destroyed Four Hundred Liters of Liquor